शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रत्नागिरी : प्रसन्न कांबळी यांची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्ने घेतली दखल, दहा हजार चौकोनांचे महाशब्दकोडे ४४ दिवसांच्या प्रयत्नातून साकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 17:27 IST

प्रसिद्ध शब्दकोडेकार प्रसन्न रंगनाथ कांबळी यांनी ४४ दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन साकार केलेल्या दहा हजार चौकोनांच्या शब्दकोड्याची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस् या विक्रमविषयक पुस्तकाने दखल घेत घेतली आहे. त्यांच्या या कर्तबगारीबद्दल या पुस्तकांच्या प्रकाशकांतर्फे प्रमाणपत्र, बिल्ला, आणि सन्मानपत्र देऊन फरीदाबाद येथे नुकतेच गौरविण्यात आले आहे. ही माहिती कांबळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देप्रसन्न कांबळी यांची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्ने घेतली दखलदहा हजार चौकोनांचे महाशब्दकोडे ४४ दिवसांच्या प्रयत्नातून साकार

रत्नागिरी : प्रसिद्ध शब्दकोडेकार प्रसन्न रंगनाथ कांबळी यांनी ४४ दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन साकार केलेल्या दहा हजार चौकोनांच्या शब्दकोड्याची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस् या विक्रमविषयक पुस्तकाने दखल घेत घेतली आहे.

त्यांच्या या कर्तबगारीबद्दल या पुस्तकांच्या प्रकाशकांतर्फे प्रमाणपत्र, बिल्ला, आणि सन्मानपत्र देऊन फरीदाबाद येथे नुकतेच गौरविण्यात आले आहे. ही माहिती कांबळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पुस्तकात समावेश झालेले कांबळी हे कोकणातील एकमेव होत. २०११ साली लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळच्या रत्नागिरी कार्यालयात कांबळी सहायक व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. येत्या एप्रिल अखेर ते सेवानिवृत्त होणार आहेत. मात्र, नोकरी करतानाच त्यांनी प्रारंभापासूनच आपला शब्दकोड्याचा छंद तितक्याच तन्मयतेने जोपासला आहे.

अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके, विविध मासिके यांमधून काबळी यांची शब्दकोडी प्रसिद्ध झाली आहेत. ६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०१० या कालावधीत त्यांनी १६३९ आडवे, १५८६ उभे असे एकूण ३२२५ शब्द असणारे दहा हजार शब्दांचे भले मोठे कोडे बनविले होते. त्याची दखल २०११ साली लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस् या विक्रमविषयक पुस्तकाने घेतली होती.भव्य अशा या शब्दकोड्याची दखल इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस् या विक्रमविषयक पुस्तकानेही घेतली आहे. भारतीयांनी विविध क्षेत्रात केलेल्या कर्तबगारीची नोंद या विक्रमविषयक पुस्तकात केली जाते. आत्तापर्यंत या पु्तकाच्या १८ आवृत्ती प्रसिद्ध झाल्या असून २०१८ मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या आवृत्तीत कांबळी यांच्या विक्रमाची नोंद होणार आहे.

त्यांच्या या विक्रमाला मान्यता देणारे विक्रमवीर म्हणुन ओळखपत्र, स्मृतीचिन्ह आणि इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस् या विक्रमविषयक पुस्तकाची प्रत देऊन या प्रकाशकांतर्फे कांबळी यांना गौरविण्यात आले.नावाप्रमाणेच प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले कांबळी हे परोपकारी वृत्तीचे असून गेली ३४ वर्षे ते मोफत वधुवर सूचक मंडळ चालवीत आहेत. त्याचबरोबर कोकणचे प्रसिद्ध असलेले उकडीचे मोदक बनविण्यात त्यांचा विशेष हातखंडा असून वयाच्या ६ व्या वर्षापासून ते मोदक बनवीत आहेत. त्यांच्या या विविधांगी कार्याची दखल अनेक संस्थांनी घेत त्यांचा गौरव केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीliteratureसाहित्य