शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : भरणेतील खूनप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 14:23 IST

भरणे येथील अण्णाच्या पऱ्यानजीक संशयास्पदरीत्या आढळलेल्या रुग्णवाहिका चालकाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देभरणेतील खूनप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याला अटकपाच दिवसांची पोलिस कोठडी

खेड : भरणे येथील अण्णाच्या पऱ्यानजीक संशयास्पदरीत्या आढळलेल्या रुग्णवाहिका चालकाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.अनंत पांडुरंग गोरे (३६, मुळगाव-चाटव, सध्या सुमन अपार्टमेंट, भडगाव-खोंडे) असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून तो ठाणे ग्रामीण पोलिस ठाण्यात सेवेत होता. मात्र तो आणि मयत संकेत शशिकांत खोपकर (२६) यांची कुटुंबे एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात.

मयत संकेत याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय पोलिस कर्मचारी असलेल्या अनंत गोरे याला होता. त्या संशयातून संकेत शशिकांत खोपकर (२६) याचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान गोरे याला खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता ९ नोव्हेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.३ नोव्हेंबर रोजी संकेत खोपकर याचा भरणेतील अण्णाच्या पºयानजीक मृतदेह आढळला होता. याचठिकाणी त्याची दुचाकी सापडली होती. घटना उघडकीस आल्यानंतर खेड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून संशयितास अटक केली. मंगेश खोपकर यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त करत संशयिताचे नाव दिले होते. त्यानंतर पोलिसांनी एका संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. जोपर्यंत संशयितास अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका संकेतच्या कुटुंबीयांनी घेतली होती.याशिवाय तालुक्यातील रोहिदास समाज बांधवांनी मारेकऱ्यास अटक करण्याची मागणी केली होती. जमावाला सामोऱ्या गेलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वेश्वर नांदेडकर यांनी संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला होता. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी