शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी पाेलिसांनी नष्ट केला १०.०३३ किलाेग्रॅम गांजा, ३.९८ किलाेग्रॅम केटामाईन

By अरुण आडिवरेकर | Updated: December 28, 2024 18:22 IST

रत्नागिरी : रत्नागिरी पाेलिसांनी गेल्या १४ वर्षात विविध १२ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला १०.०३३ किलाेग्रॅम गांजा आणि ३.९८ किलाेग्रॅम केटामाईन ...

रत्नागिरी : रत्नागिरी पाेलिसांनी गेल्या १४ वर्षात विविध १२ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला १०.०३३ किलाेग्रॅम गांजा आणि ३.९८ किलाेग्रॅम केटामाईन असा एकूण १४.०१३ किलाेग्रॅम अंमली पदार्थ नष्ट केला आहे. नवी मुंबईतील तळाेजा येथे रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पाेलिसांनी अंमली पदार्थ जाळून नष्ट केला.पोलिस महासंचालकांकडून एन. डी. पी. एस अॅक्ट १९८५ अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्दे माल नाश करण्याकरिता सर्व पोलिस अधीक्षकांना निर्देश देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ड्रग्ज डिस्पोजल समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे आहेत. सन २००६ ते सन २०२० या कालावधीत गुंगी कारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ या कायद्यान्वये  दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी एकूण १२ एन. डी. पी. एस. कायद्यांतर्गत गुन्ह्यातील मुद्दे माल नाश करण्याबाबत न्यायालयाकडून आदेश प्राप्त करुन घेतले हाेते. हा मुद्देमाल जाळण्याच्या पद्धतीने नाश करण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडे अर्ज करण्यात आला होता.त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडून हा मुद्देमाल नवी मुंबईतील तळाेजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. येथे नाश करण्याची मंजुरी दिली हाेती. त्यानुसार पोलिस निरीक्षक नितीन ढेरे व पथकाने शुक्रवारी जिल्ह्यामध्ये एकूण दाखल १२ विविध गुन्ह्यातील १०.०३३ किलोग्राम गांजा व ३.९८ किलोग्राम केटामाईन असा मुद्देमाल जाळून नष्ट केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिस