शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : पोलीस बंदोबस्तात तालुक्यांमध्ये धान्य वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 16:28 IST

स्थानिक वाहतूकदार आणि शासकीय ठेकेदार यांच्यातील वादामुळे नोव्हेंबर महिन्याची धान्याची वाहतूक खोळंबली असल्याने जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी बुधवारपासून अन्न महामंडळाच्या गोदामापासून पोलीस बंदोबस्तात सर्व तालुक्यांमध्ये धान्य वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या वाहतुकीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ​

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्तात तालुक्यांमध्ये धान्य वाहतूक सुरूअडथळा आणण्यांवर गुन्हे दाखल करणार

रत्नागिरी : स्थानिक वाहतूकदार आणि शासकीय ठेकेदार यांच्यातील वादामुळे नोव्हेंबर महिन्याची धान्याची वाहतूक खोळंबली असल्याने जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी बुधवारपासून अन्न महामंडळाच्या गोदामापासून पोलीस बंदोबस्तात सर्व तालुक्यांमध्ये धान्य वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या वाहतुकीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.स्थानिक वाहतूकदारांना डावलून क्रिएटिव्ह क्रेन या शासननियुक्त ठेकेदाराकडून सध्या धान्य वाहतूक केली जात आहे. त्यामुळे स्थानिक ठेकेदारांवर अन्याय होत असल्याचा आरोप स्थानिक वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मध्यंतरी शासननियुक्त ठेकेदाराच्या गाड्या स्थानिक वाहतूकदारांनी परत पाठविल्या होत्या.जिल्ह्यातील सर्वच धान्य दुकानांमधून सप्टेंबर महिन्यातील धान्याची उचल झाली असून, आॅक्टोबर महिन्याच्या एकूण ६६०० टन धान्यापैकी ६४ टक्के धान्याची उचल पॉस मशीनद्वारे करण्यात आली आहे. मात्र, शासकीय ठेकेदाराची वाहने भीतीपोटी कमी करण्यात आल्याने नोव्हेंबरच्या धान्याच्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे.

पुढील महिन्याच्या सहा तारखेपासून दिवाळी असल्याने जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासोबत मंगळवारी बैठक घेऊन पोलीस बंदोबस्तात तालुक्यांमध्ये धान्य वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरानजीकच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामापासून पोलीस बंदोबस्तात धान्याची वाहतूक सर्व तालुक्यांना सुरू झाली आहे.जनतेला वेळेत धान्य मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे दक्ष असून, याठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्याला जाणाऱ्या धान्याच्या वाहनासोबत पोलीस कर्मचारी देण्यात येत आहे.

पोलीस प्रशासन आणि पुरवठा विभाग यांच्या सहकार्याने ही धान्याची वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे जनतेला दिवाळीचे नियतन वेळेत मिळणार असल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे. 

नोव्हेंबर महिन्यातील धान्याच्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र, पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ही वाहतूक आता सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचे धान्याचे वितरण जनतेला वेळेत होणार आहे. या वाहतुकीत अडथळा निर्माण करून गैरसोय निर्माण करण्याचा प्रयत्न करणाºया दोषी व्यक्तींवर यापुढेही गुन्हे दाखल करण्यात येतील.डॉ. जयकृष्ण फड, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी