शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

रत्नागिरी : मालगुंड येथे साडेतीन एकर जागेवर मिरचीची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 16:54 IST

हवामानावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आंबा पिकामध्ये वातावरणातील बदलांमुळे अनिश्चितता आली आहे. आंबा व्यवसायाला काहीतरी जोडव्यवसाय सुरू करावा, यासाठी रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील युवक यज्ञेश भिडे याने साडेतीन एकरवर मिरची लागवड केली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी : मालगुंड येथे साडेतीन एकर जागेवर मिरचीची लागवडयुवा शेतकऱ्याने ठेवला आदर्श,  यज्ञेश भिडे याची यशस्वी वाटचाल

मेहरून नाकाडेरत्नागिरी : हवामानावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आंबा पिकामध्ये वातावरणातील बदलांमुळे अनिश्चितता आली आहे. आंबा व्यवसायाला काहीतरी जोडव्यवसाय सुरू करावा, यासाठी रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील युवक यज्ञेश भिडे याने साडेतीन एकरवर मिरची लागवड केली आहे.

गतवर्षीदेखील यज्ञेश याने दीड एकर क्षेत्रावर मिरची लागवड केली होती. तेव्हा त्याला २४ टन मिरचीचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीच्या यशस्वी प्रयोगानंतर यावर्षी पुन्हा साडेतीन एकरवर त्याने मिरचीची लागवड केली आहे. सध्या या मिरचीची तोड सुरू झाली असून, रत्नागिरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ती विक्रीला पाठविण्यात येत आहे.यज्ञेश याने हॉर्टीकल्चर विषयात पदवी घेतली आहे. वडिलोपार्जित आंबा व्यवसायाबरोबरच त्यांचा प्रक्रिया उद्योग आहे. दरवर्षी हवामानातील बदलांमुळे आंबापीक धोक्यात येत आहे. खर्चाच्या तुलनेत पीक येत नसल्यामुळे शेतकरी सध्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. मात्र, असे असताना त्याला पूरक व्यवसाय किंवा शेती करावी, असे यज्ञेशने ठरविले.

भाताचे पीक घेतल्यानंतर जमीन मोकळीच असायची. त्यामुळे त्याने त्यावर अन्य पीक घेण्याचे ठरविले. नगदी पिकात कोणत्या पिकाची निवड करावी, याचा त्याने अभ्यास केला. यासाठी कृषीतज्ञांचा सल्ला घेतला व हिरव्या मिरचीचे उत्पन्न घेण्याचे ठरविले.वडील डॉ. विवेक भिडे यांनी त्याला यासाठी प्रोत्साहन दिले. हिरवी तिखट मिरची (जी फोर-सेगमेंट) करत असताना व्हीएनआर सुनिधी जातीची लागवड करण्याचे ठरविले. सांगली येथून एक रूपयाला एक रोप याप्रमाणे अडीच हजार रोपे विकत आणली. त्यासाठी सुरूवातीला जमीन चांगली नांगरून घेतली, रोटा ट्रॅक्टर फिरवला. जमिनीत शेण, लेंडी, गांडूळ खत घातले.

पाच फुटी सऱ्या पाडल्या. त्यानंतर सव्वा फुटाला एक रोपप्रमाणे लागवड केली. लागवडीपूर्वी वाफे/सरी यावर मल्चींग पेपरचे आच्छादन केले. यामुळे तण कमी उगवते व रोगांचे प्रमाण कमी राहते. तसेच पाण्यासाठी ठिबकचा वापर केला. मिरची रोपांची लागवड झाल्यानंतर साठाव्या दिवशी उत्पन्न मिळण्यास सुरूवात होते.

गतवर्षी यज्ञेशने दीड एकर जागेत मिरची लागवड केली होती. त्यावेळी दीड टन उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर यावर्षी यज्ञेशचा विश्वास आणखी दृढ झाला व त्याने यावर्षी मिरची लागवडीचे क्षेत्र वाढवण्याचे ठरविले. साडेतीन एकर क्षेत्रावर त्याने मिरची लागवड केली आहे.

दीड एकर जागेत २० डिसेंबरला रोपे लावली तर दोन एकर क्षेत्रावर २५ जानेवारी रोजी लागवड केली. लागवड केल्यापासून साठाव्या दिवशी उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली. यज्ञेशच्या प्लॉटवर सध्या मिरचीची तोड सुरू असून, दिवसाला ३०० ते ३५० किलो मिरची काढण्यात येत आहे.इतरांना रोजगाराबरोबरच स्वत:ला अर्थार्जन मिळण्यास मदतनिव्वळ आंबा पिकावर अवलंबून राहण्यापेक्षा पावसाळ्यानंतर नगदी पिकांची लागवड करणे आवश्यक आहे. कोणत्याही पिकाची लागवड करताना शास्त्रशुध्द पध्दतीचा वापर करणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्राबरोबरच तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन घेणेदेखील आवश्यक आहे. यासाठी नगदी पिकांची निवड करून लागवड केली पाहिजे.

शुगर क्वीन जातीचे  कलिंगडमिरची शेजारील २० गुंठ्यांच्या प्लॉटवर यज्ञेशने कलिंगड लागवड केली आहे. या प्लॉटवरदेखील मल्चिंग पेपरचे आच्छादन टाकून शुगर क्वीन जातीच्या कलिंगडाची ६०० रोपे लावली आहेत. सध्या फळे वेलीवर लगडली असून, येत्या आठ ते दहा दिवसात त्यांची तोडणी सुरू होणार आहे. कलिंगडाला उन्हाळ्याच्या दिवसात स्थानिक बाजारपेठेत मागणी चांगली असते. त्यामुळे कलिंगडचा चांगला खप होईल.साडेचार टन मिरचीआतापर्यंत साडेचार टन मिरची काढण्यात आली आहे. दररोज मिरची तोड सुरू असून, ४०, ४५ ते ५० रूपये किलो दराने या मिरचीची विक्री सुरू आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही मिरची लिलावासाठी पाठविण्यात येत असल्याने यज्ञेशला रत्नागिरीतच बाजारपेठ मिळाली आहे.मका, झेंडूचीदेखील लागवडमिरची पिकाच्या कडेला सापळा पीक म्हणून यज्ञेशने मका, झेंडू लावला आहे. यातील झेंडूची काढणी सुरू झाली असून, आतापर्यंत ५०० किलो झेंडू काढण्यात आला आहे. शिमगोत्सवामुळे झेंडूला मागणीदेखील चांगली आहे. मका पीकही तयार होत असून, लवकरच त्याची काढणी सुरू होईल. याशिवाय त्याने कोथिंबीर व सिमला मिरचीची लागवडही केली आहे. 

या पिकावर आंब्याप्रमाणे वेळोवेळी कीटकनाशक फवारणी करणे आवश्यक आहे. एकाच प्रकारचे पीक घेण्यापेक्षा शेतकऱ्यांनी विविध पिकांची निवड करावी. तरूणांनी रोजगार शोधण्यापेक्षा वडिलोपार्जित जमिनीत शेती केली तरी अन्य लोकांना रोजगाराबरोबरच अर्थार्जनाचे साधनही प्राप्त होईल.- यज्ञेश विवेक भिडे,मालगुंड 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीagricultureशेती