शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

रत्नागिरी :विद्यार्थ्यांच्या कलेतून साकारली वन्यप्राण्यांची छायाचित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 15:15 IST

सह्याद्र्री निसर्ग मित्र, चिपळूण, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई व आयसीआयसीआय बँक यांच्यातर्फे विद्यार्थ्यांनी काढलेल्या वन्यजीवांच्या फोटोंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ब्राम्हण सहाय्यक संघ सभागृह, चिपळूण येथे पार पडले. विशेष म्हणजे हे फोटो विद्यार्थ्यांनी मेहनतीने काढले आहेत आणि या फोटोमध्ये वाघासारख्या हिंस्त्र प्राण्याच्या फोटोंचाही समावेश आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या कलेतून साकारली वन्यप्राण्यांची छायाचित्रेचिपळुणात छायाचित्र प्रदर्शन, वाघासह वन्यप्राणी कॅमेऱ्यात कैद

चिपळूण : सह्याद्र्री निसर्ग मित्र, चिपळूण, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई व आयसीआयसीआय बँक यांच्यातर्फे विद्यार्थ्यांनी काढलेल्या वन्यजीवांच्या फोटोंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ब्राम्हण सहाय्यक संघ सभागृह, चिपळूण येथे पार पडले. विशेष म्हणजे हे फोटो विद्यार्थ्यांनी मेहनतीने काढले आहेत आणि या फोटोमध्ये वाघासारख्या हिंस्त्र प्राण्याच्या फोटोंचाही समावेश आहे.शिरोशी (जिल्हा ठाणे) येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गावित, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे, सचिव उदय पंडित, नितीन नार्वेकर, प्रकल्प अधिकारी प्रसाद गोंड, सागर रेडीज, अभिषेक सिंग यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांतील २० शाळांमधील निवडक ६० विद्यार्थी व २० शिक्षक उपस्थित होते.भारत हा जगातील आठ जैवविविधतापूर्ण स्थळांपैकी एक आहे आणि भारतातील सह्याद्रीचा भाग जैवविविधतेने संपन्न आहे. या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई, तसेच आयसीआयसीआय बँक यांच्या सहकार्याने ई-मॅमल हा प्रकल्प सात जिल्ह्यांतील २० शाळांमध्ये राबविला जात आहे.

हा प्रकल्प जगातील १७ देशांमध्ये राबविण्यात येत असून, भारतात तो पहिल्यांदाच राबवून वन्यजीवांची माहिती मिळवण्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पामध्ये प्रत्येक शाळेतील ८ वी व ९ वीचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. प्रकल्पात सहभागी प्रत्येक शाळेला ३ ट्रॅप कॅमेरे, लॅपटॉप, प्रोजेक्टर, प्रिंटर, इंटरनेट, दुर्बीण, बॅटरी आणि मेमरी कार्डस् आणि माहितीपत्रिका देण्यात आली आहे.विद्यार्थ्यांचा ५ ते १०चा गट तयार करून कॅमेरे शाळेच्या परिसरात बसविण्यात आले असून, त्यामध्ये आलेले फोटो विद्यार्थी स्वत: ई-मॅमल वेबसाईटवर अपलोड करतात. त्यानंतर ही सर्व माहिती संशोधनासाठी वापरली जाते. त्यामुळे अनेक संशोधाकांचा पैसा आणि वेळ वाचतो.

या प्रदर्शनामध्ये पट्टेरी वाघ, अस्वल आणि बिबट्या तसेच दुर्मीळ व नष्ट होण्याच्या मार्गावर असणारे खवले मांजर त्याचप्रमाणे साळिंदर आणि सहज आढळणारे भेकर, सांबर, रानडुक्कर, रानटी ससे, काळमांजर, मुंगूस आदी प्राण्यांचे २०० फोटो या प्रदर्शनात लावण्यात आले आहेत. ई-मॅमल हा महत्त्वाचा प्रकल्प असून, वर्षभरात या विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांना खूप मेहनत करून मिळणाऱ्या फोटोंच्या तोडीसतोड फोटो मिळवले आहेत. हे फोटो जगभरातील शास्त्रज्ञ वापरणार आहेत.

सुरुवातीला मला या प्रकल्पात रुची वाटली नाही. परंतु, कॅमेऱ्यामध्ये वाघ, खवले मांजर, रानकुत्रे या दुर्मीळ प्राण्यांचे फोटो मिळाल्यामुळे आम्ही अचंबित झालो व प्रकल्पाचे महत्त्व समजून आता काम करताना मजा येते. मी भविष्यात प्राण्यांवरील संशोधन, संवर्धन करण्याचे ठरवले आहे.- प्राजक्ता गवस, विद्यार्थिनी, मंगेली हायस्कूल

टॅग्स :forest departmentवनविभागRatnagiriरत्नागिरी