शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी पंचायत समितीची सभा गाजली अनुपस्थित अधिकाऱ्यांमुळे , सभेत खडाजंगी, तीव्र संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 16:30 IST

अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेचे कामकाज काही वेळ थांबविण्यात आले होते. तसेच सभा तहकूब करण्याची मागणीही काही सदस्यांनी केली़ मात्र, उपसभापती शंकर सोनवडकर यांनी पुढाकार घेतल्याने सभा पुढे सुरु ठेवण्यात आली़

ठळक मुद्देरत्नागिरी पंचायत समितीची सभा गाजली अनुपस्थित अधिकाऱ्यांमुळे सभेत खडाजंगी, तीव्र संताप, तहकुब करण्याची सदस्यांची मागणी

रत्नागिरी : अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेचे कामकाज काही वेळ थांबविण्यात आले होते. तसेच सभा तहकूब करण्याची मागणीही काही सदस्यांनी केली़ मात्र, उपसभापती शंकर सोनवडकर यांनी पुढाकार घेतल्याने सभा पुढे सुरु ठेवण्यात आली़या सभेमध्ये सुरुवातीला माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी, केरळमध्ये वादळाने मृत्यू पावलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली़ सभेच्या सुरुवातीलाच अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़ सार्वजनिक बांधकाम खाते, शिक्षण विभाग, तालुका कृषी विभाग, महावितरण आदींचे अधिकारी सभेला अनुपस्थित होते़ त्यामुळे सभा तहकूब करण्याची मागणी सदस्यांनी केली़. त्यासाठी काही वेळ सभेचे कामकाजही सदस्यांनी थांबविले होते़ .

त्यावेळी उपसभापती सोनवडकर यांनी सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांना एकत्रित बोलावून याबाबत चर्चा करण्यात येईल़ सभेचे कामकाज सुरु ठेवा, अशी विनंती सदस्यांनी केली़ त्यावेळी सदस्यांनी त्यांच्या विनंतीला मान देत सभा पुढे सुरु ठेवली़ यावेळी उशिरा आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना सभापती विभांजली पाटील यांनी चांगलेच फैलावर घेतले़ त्यांनी यापुढे कारण सांगून चालणार नाही, अशा शब्दात सुनावले़जिओ कंपनीकडून ग्रामीण भागामध्ये जमीनीची खोदाई करुन केबल टाकण्याचे काम सुरु आहे़ याबाबत बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांसमोर प्रश्न उपस्थित करुन त्यांना तात्काळ काम बंद करण्याचे नोटीस देण्यात यावी़ त्याचबरोबर त्यांच्याकडून काम सुरु करण्यापूर्वी अनामत रक्कम घ्यावी, अशा सूचना सदस्य गजानन पाटील यांनी दिली़ त्याचबरोबर केबलच्या खोदाईमुळे अनेक ठिकाणी अपघात होऊन जिवितहानी होण्याची भिती सदस्यांनी व्यक्त केली़यावेळी सदस्या साक्षी रावणंग यांनी १७ शाळा पटसंख्येअभावी बंद करण्यात आल्या आहेत़ त्यातील विद्यार्थ्यांची अन्य शाळेमध्ये सोय करण्यात आली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला़ मात्र, हे करताना काही विद्यार्थ्यांना दोन ते अडीच किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो़ त्याचबरोबर नाखरे उंबरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्याने तेथील विद्यार्थीही शाळेत जात नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले़यावेळी सदस्य गजानन पाटील, अभय खेडेकर, ऋषिकेश भोंगले, दत्तात्रय मयेकर, सदस्या मेघना पाष्टे, संजना माने, रिहाना साखरकर, स्रेहा चव्हाण, साक्षी रावणंग व अन्य उपस्थित होते़निषेधाचा ठरावदिल्लीतील जंतरमंतर येथे समाजकंटकांकडून राज्यघटनेची प्रत जाळण्यात आली़ तसेच भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही अपशब्द वापरण्यात आले़ याबद्दल सदस्या साक्षी रावणंग यांनी सभागृहामध्ये निषेधाचा ठराव मांडला़ त्याला पंचायत समितीच्या सभागृहाने मंजुरी दिली़

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीRatnagiriरत्नागिरी