शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : एलईडी मच्छीमारीबाबत सुरेश प्रभूंचे बंदीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 16:45 IST

एलईडी लाईटद्वारे केल्या जाणाऱ्या मच्छीमारीला आळा घालण्यासाठी व ही मासेमारी पूर्ण बंद करण्यासाठी तटरक्षक दल व प्रशासनाला व्यापक अधिकार दिले जाणार आहेत. याबाबतचे स्पष्ट संकेत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी नवी दिल्ली येथे मच्छीमार प्रतिनिधी, तटरक्षक दलाचे अधिकारी यांच्याबरोबर झालेल्या संयुक्त बैठकीत दिले आहेत.

ठळक मुद्देएलईडी मच्छीमारीबाबत बंदीच्या कडक अंमलबजावणीसुरेश प्रभूंचे आदेशतटरक्षक दल व प्रशासनाला व्यापक अधिकार

रत्नागिरी : एलईडी लाईटद्वारे केल्या जाणाऱ्या मच्छीमारीला आळा घालण्यासाठी व ही मासेमारी पूर्ण बंद करण्यासाठी तटरक्षक दल व प्रशासनाला व्यापक अधिकार दिले जाणार आहेत.

याबाबतचे स्पष्ट संकेत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी नवी दिल्ली येथे मच्छीमार प्रतिनिधी, तटरक्षक दलाचे अधिकारी यांच्याबरोबर झालेल्या संयुक्त बैठकीत दिले आहेत. राज्यांची सागरी हद्द ही १२ऐवजी २५ सागरी मैल करण्याचा प्रस्तावही विचाराधीन असल्याचे प्रभू यांनी सांगितले.२२ फेब्रुवारी २०१८ रोजी सिंधुदुर्गचे सुपुत्र व केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या दालनात सर्व संबंधित घटकांची संयुक्त बैठक झाली. त्यावेळी केंद्रीय कृषी मंत्रालयाचे मुख्य सचिव एस. के. पट्टनाईक, भारतीय तटरक्षक दलाचे कमांडन्ट भीमसिंह कोठारी, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्गचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य रविकिरण तोरसकर, इतर प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एलईडी लाईटने होणाऱ्या मासेमारी वादासंदर्भात कृषी मंत्रालय, तटरक्षक दल, केंद्रीय वाणिज्य खाते यांची उच्चस्तरीय संयुक्त बैठक तातडीने बोलावण्यात यावी, अशी विनंती सिंधुदुर्ग भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे केली होती.

प्रसंगाचे गांभीर्य ओळखून शासनातर्फे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एलईडी लाईट मासेमारी बंदीची कडक अंमलबजावणी होण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, या विषयावर चर्चा झाली. 

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी