शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : सुकोंडी धरणाचे पाणी उद्योगपतींना देण्यास विरोध, पंचक्रोशीतील लोकांमधून प्रचंड संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 17:13 IST

सुकोंडी - वाघिवणे - बोरथळ पंचक्रोशीतील धरणाचे पाणी हर्णै - अडखळ बायपास येथील बिल्डरांना द्यावे, असा शासन आदेश झाला आहे. मुळातच या धरणाला गेली अनेक वर्षे गळती असून, या धरणाच्या आजूबाजुच्या गावांची तहान या धरणावर न भागवता हे पाणी बिल्डरला देण्याचा शासन आदेश झाल्याने पंचक्रोशीतील लोकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देहर्णै -अडखळ बायपास येथील बिल्डरांना देण्याचा शासन आदेश धरणाला गेली अनेक वर्षे गळती सुरूपंचक्रोशीतील प्रचंड संताप, आधी गावची तहान भागवा.

दापोली : सुकोंडी - वाघिवणे - बोरथळ पंचक्रोशीतील धरणाचे पाणी हर्णै - अडखळ बायपास येथील बिल्डरांना द्यावे, असा शासन आदेश झाला आहे. मुळातच या धरणाला गेली अनेक वर्षे गळती असून, या धरणाच्या आजूबाजुच्या गावांची तहान या धरणावर न भागवता हे पाणी बिल्डरला देण्याचा शासन आदेश झाल्याने पंचक्रोशीतील लोकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.स्थानिक लोकांना पुरेसे पाणी मिळत नसताना ते उद्योगपतींच्या घशात घालणार असाल, तर आमचा प्रचंड विरोध असेल, अशी भूमिका आंजर्ले पंचक्रोशीने घेतली आहे. गुरूवारी झालेल्या सभेत हा शासन आदेश रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.आंजर्ले - पंचक्रोशीची तहान भागवण्यासाठी १५ वर्षांपूर्वी सुकोंडी - वाघिवणे धरण बांधण्यात आले. पंचक्रोशीच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन स्थानिक लोकांनी आपल्या जमिनी कवडीमोल किमतीने धरणासाठी दिल्या.

धरणाची क्षमता (४१७ टीएमसी) एवढी आहे. या पाण्यावर पंचक्रोशीची तहान भागत नाही. या भागातील अनेक वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेली अनेक वर्षे या धरणाला गळती लागली आहे.धरणाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत असताना शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. धरण नादुरुस्त असल्यामुळे पंचक्रोशीतील अनेक वाड्यांची पाण्याची गरज पूर्ण होत नाही. असे असताना धरण क्षेत्राच्या बाहेरील अडखळ - हर्णै बायपास परिसरातील बिल्डर मुकुंद श्रीधर दंडवते यांना दररोज (८७ टीएमसी) म्हणजे लाखो लीटर पाणी उचलण्याची परवानगी शासनाने दिली आहे.

धरण परिसरातील लोकांची गरज लक्षात घेण्याऐवजी लोकांच्या तोंडचे पाणी पळवून उद्योगपतींच्या घशात घातले जाणार असेल तर पंचक्रोशीचा प्रखर विरोध असेल, अशी भूमिका पंचक्रोशीने घेतली आहे.वाघिवणे धरणाला गळती असल्यामुळे सध्या या धरणात २५ टक्केसुद्धा पाणीसाठा नाही. धरण कोरडे पडले आहे, अशा परिस्थितीत ८७ टीएमसी पाणी देण्याचा शासन निर्णय झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पंचक्रोशीने नोव्हेंबर महिन्यात विरोधाचे पत्र शासनाकडे दिले होते.

पंचक्रोशीची हरकत असताना शासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी उचलण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ही परवानगी रद्द करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश म्हादलेकर यांनी दिला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी