शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : झाड तोडताना जमिनीवर आदळून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 18:29 IST

झाड तोडत असताना फांदी अंगावर पडेल, या भीतीने पळणारा जोरात जमिनीवर आदळला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना या व्यक्तीचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देझाड तोडताना जमिनीवर आदळून एक ठारहातखंबा-बौध्दवाडीतील घटना : तपास सुरु

रत्नागिरी : झाड तोडत असताना फांदी अंगावर पडेल, या भीतीने पळणारा जोरात जमिनीवर आदळला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना या व्यक्तीचा मृत्यू झाला.विलास शिवराम कांबळे (५३, बौध्दवाडी, हातखंबा) असे मृत व्यक्तीचे नाव असून, सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना हातखंबा - बौध्दवाडी येथे घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात खबर देणारे सुयोग नंदकुमार कांबळे यांचे चुलते विलास कांबळे व हेमंत कांबळे हे बहिणीचे लग्न असल्याने साफसफाईचे काम करीत होते. त्यावेळी नजीकचे झाड तोडण्याचे काम सुरू होते. झाडाला बांधलेला दोर एका बाजूला विलास कांबळे व दुसऱ्या बाजूला अजित कांबळे यांनी पकडला होता.झाड अंगावर पडेल, या भीतीने विलास कांबळे यांनी दोरी सोडून दिली व धावत सुटले. त्यावेळी तोल जाऊन जमिनीवर आदळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी त्यांना रक्तस्त्रावही झाला होता. त्यामुळे काही ग्रामस्थांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चित्रा मढवी करीत आहेत. सध्या पाऊस जवळ आल्याने ग्रामीण भागात पावसाळी कामे सुरु झाली आहेत. त्यातूनच हा प्रकार घडला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात