शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी यापुढे मॅँगो पर्यटन सिटी,-नगराध्यक्ष राहुल पंडित यांची माहिती,  पर्यटन विकासासाठी सर्व व्यक्ती, संस्था एकत्र, अनेक सुविधा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 16:04 IST

रत्नागिरी मॅँगो पर्यटन सिटी अशी रत्नागिरी शहराची नवीन ओळख यापुढे निर्माण केली जाणार आहे. रत्नागिरी शहर व गणपतीपुळे परिसरात वर्षभरातील मोठ्या विक एन्डला येणाऱ्या पर्यटकांना विविध पर्यटन सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. रत्नागिरी मॅँगो पर्यटन भरारी या नावाने पर्यटन क्षेत्रात काम करीत असलेल्या सर्व व्यक्ती व संस्था त्यासाठी एकत्र काम करणार आहेत. ही माहिती रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देरत्नागिरी यापुढे मॅँगो पर्यटन सिटीनगराध्यक्ष राहुल पंडित यांची माहितीपर्यटन विकासासाठी सर्व व्यक्ती, संस्था एकत्र, अनेक सुविधा उपलब्ध

रत्नागिरी : रत्नागिरी मॅँगो पर्यटन सिटी अशी रत्नागिरी शहराची नवीन ओळख यापुढे निर्माण केली जाणार आहे. रत्नागिरी शहर व गणपतीपुळे परिसरात वर्षभरातील मोठ्या विक एन्डला येणाऱ्या पर्यटकांना विविध पर्यटन सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

रत्नागिरी मॅँगो पर्यटन भरारी या नावाने पर्यटन क्षेत्रात काम करीत असलेल्या सर्व व्यक्ती व संस्था त्यासाठी एकत्र काम करणार आहेत. ही माहिती रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.रत्नागिरी शहराच्या भाट्ये समुद्र किनारी व्हॅली क्रॉसिंग, तर रत्नदुर्ग किल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुहेमधील सफरीचा थरार आणि रॅपलिंग या साऱ्याच्या अनुभव पर्यटकांना व रत्नागिरीकरांना देण्याची जबाबदारी रत्नागिरीच्या जिद्दी माऊंटेनिअरिंग आणि रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सने स्वीकारली आहे.

थिबा पॅलेससमोरील सागरी बेटाच्या सफरीसह हातिसपर्यंत बॅक वॉटरची सफर डॉल्फिन बोट क्लब, सुशेगाद जलविहार संस्थांतर्फे घडवली जाणार आहे. मालगुंड किनाऱ्यावर पर्यटकांना पॅरामोटरिंग सुविधा मिळणार आहे. पर्यटकांसाठी हॉटेल्सच्या माध्यमातून पर्यटन पॅकेजिस दिली जाणार आहेत.

यावेळी सुहास ठाकुरदेसाई, सचिन देसाई, धीरज पाटकर, राज घाडीगावकर, प्रशांत परब, जितेंद्र शिंदे, भाई रिसबूड, वीरेंद्र वणजु, गणेश चौगुले, एरिक, वैभव सरदेसाई आदी उपस्थित होते. यावेळी मीडिया माहिती पत्रकाचे प्रकाशनही झाले. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMuncipal Corporationनगर पालिका