शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri news: मुख्यमंत्र्यांची सभा झाली ओके, एसटीला मिळाले उत्पन्नाचे खोके

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 18:59 IST

सभेची माणसे मतदार संघातीलच असल्याचे सांगण्यासाठी एस.टी. बसेसचा वापर अधिक उपयुक्त

रत्नागिरी : गेला काही काळ उत्पन्नासाठी झगडणाऱ्या आणि सतत तोटा होणाऱ्या एस.टी.ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेडमधील सभेमुळे थोडा हातभार लागला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या सभेसाठी जिल्ह्याच्या पाच आगारांतून १०८ बसेसचे आरक्षण करण्यात आले होते. या बसेसमुळे सभेला गर्दी झाली आणि एस.टी.ला तब्बल १४ लाख ५० हजारांचे उत्पन्न मिळाले. राजकारणात कुणाला खोके मिळाले असोत किंवा नसोत, पण ही सभा ओके झाल्यामुळे तोट्यातील एस.टी.ला उत्पन्नाचे खोके मिळाले आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांची रविवारी खेडमध्ये झालेली सभा केवळ जिल्ह्याचेच नाही तर राज्याचे लक्ष लागलेली ठरली. ५ मार्चला उद्धव ठाकरे यांनी ज्या मैदानात सभा घेतली, त्याच मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार, असे जाहीर करण्यात आल्याने आधीपासूनच या सभेबाबत मोठी उत्सुकता होती. विशेषत: सभेला लोक येणार की नाही, आले तर ते उद्धव ठाकरं यांच्या सभेपेक्षा कमी असतील की जास्त याबाबतच्या चर्चा रंगल्या होत्या.या सभेला प्राधान्याने खेड, दापोली आणि मंडणगड या तीन तालुक्यांतील म्हणजेच आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघातील जास्तीत जास्त लोक यावेत, असे नियोजन करण्यात आले होते. त्यांच्यासह अन्य तालुक्यातील शिवसैनिकही सभेसाठी उपस्थित राहणार असल्याने या लोकांची ने आण करण्यासाठी एस. टी. बसेसचे आरक्षण करण्यात आले होते. त्यासाठी रविवारी पाच आगारांतून १०८ गाड्या सभेसाठी सोडण्यात आल्या. त्यामुळे रत्नागिरी विभागाला साडेचाैदा लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.खासगी गाड्यांसह एसटीच्या गाड्यांचा आधार घेण्यात आल्याने एस.टी.लाही थोडा दिलासा मिळाला आहे. त्यासाठी दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी, देवरुख आगारातून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. सभेसाठी वेळेवर सोडणे व सभा संंपल्यानंतर पुन्हा आणून सोडण्याची जबाबदारी होती. प्रत्येक आगारातून माणसांच्या संख्येनुसार गाड्यांचे आरक्षण करण्यात आले होते. दापोली आगारातून ३१, खेड २५, चिपळूण २७, रत्नागिरी ९ व देवरुख आगारातून सहा बसेस सोडण्यात आल्या होत्या. एकूण १०८ एस.टी. बसेसमुळे रत्नागिरी विभागाला साडेचाैदा लाख रुपये मिळाले आहेत.एस. टी. आरक्षणात असाही फायदाकोणत्याही राजकिय सभेला बाहेरून माणसे आणल्याचा आरोप केला जातो. सभेच्या गर्दीचा दावा खोडण्यासाठी हा फंडा हमखास वापरला जातो. अशावेळी माणसे स्थानिकच होती, हे सिद्ध करायची वेळ आली तर एस.टी.चे आरक्षण अधिक उपयुक्त ठरते. बसेस कोणकोणत्या भागातून आल्या याचे रेकॉर्ड आपोआप मिळते. त्यामुळे आमच्या सभेची माणसे मतदार संघातीलच असल्याचे सांगण्यासाठी एस.टी. बसेसचा वापर अधिक उपयुक्त आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदे