शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी नगर परिषद : थेट निवडणुकीला सामोरे जाण्यावरून सेनेत दोन गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 17:00 IST

रत्नागिरी नगर परिषदेत येत्या काही काळात नगराध्यक्ष पदावरून राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. विद्यमान नगराध्यक्ष राहुल पंडित यांना पक्षाने दिलेली २ वर्षांची मुदत डिसेंबर २०१८ मध्ये संपणार आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी नगर परिषद : थेट निवडणुकीला सामोरे जाण्यावरून सेनेत दोन गटनगराध्यक्षपदावरून राजकीय भूकंप होणार?

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेत येत्या काही काळात नगराध्यक्ष पदावरून राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. विद्यमान नगराध्यक्ष राहुल पंडित यांना पक्षाने दिलेली २ वर्षांची मुदत डिसेंबर २०१८ मध्ये संपणार आहे. त्यानंतर ठरल्याप्रमाणे बंड्या साळवी यांना नगराध्यक्षपदासाठी संधी देण्याचेही ठरले होते. त्यामुळे राहुल पंडित यांचा राजीनामा घेऊन थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला शिवसेनेने सामोरे जावे की, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, यावरून सेनेत दोन गट पडले आहेत.

नगराध्यक्ष राहुल पंडित

सन २०१९मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट निवडणूक होणे सेनेला धोकादायक वाटते आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक होईपर्यंत पंडित यांना नगराध्यक्षपदावर मुदतवाढ मिळणार का, या चर्चेलाही उधाण आले आहे.३० सदस्य असलेल्या रत्नागिरी नगर परिषदेत सध्या सेनेकडे १७ नगरसेवकांचे बळ आहे. राष्ट्रवादीकडे ६, भाजपकडे ५ व अपक्ष २ असे विरोधकांकडे १३ नगरसेवकांचे बळ आहे. रत्नागिरी नगर परिषदेत एकहाती सत्ता मिळाल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक होते. पदाचा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्याबाबत ग्रामदेवतेच्या साक्षीने मार्ग काढण्यात आला.

बंड्या साळवी

नगराध्यक्षपदावर प्रथम २ वर्षांसाठी राहुल पंडित यांना संधी देण्याचे ठरले व त्यानंतर सेनेचे गटनेते बंड्या साळवी यांना नगराध्यक्षपदाची संधी देण्याचे ठरविण्यात आले होते.शिवसेनेत जे ठरते, त्याची अंमलबजावणी होते, हे याआधीही रत्नागिरीत दिसून आले आहे. उपनगराध्यक्ष असताना राहुल पंडित यांनी मुदत संपताच स्वत:हून राजीनामा दिला होता. नगराध्यक्षपदासाठी राहुल पंडित यांच्यासाठी शिवसेनेने ठरविलेला त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाल येत्या डिसेंबर महिन्यात संपणार आहे.

त्यामुळे राहुल पंडित नगराध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा आहे. मात्र, विधानसभा निवडणूक पुढील वर्षी होणार असल्याने पंडित यांना राजीनामा द्यायला लावून थेट नगराध्यक्ष निवडणुकीला सामोरे जाण्यात सेनेतील एका गटाला धोका वाटत आहे.चांगले काम झाले नाही?ठरल्याप्रमाणे पंडित यांचा नगराध्यक्षपदाचा राजीनामा घेणे योग्यच आहे. रत्नागिरी शहर हा सेनेचा बालेकिल्ला असताना थेट नगराध्यक्ष निवडणुकीला सामोरे जाण्यात कोणताही धोका नाही, असे सेनेतील दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे. थेट निवडणुकीला सामोरे जाण्यात काहीजणांना धोका वाटण्यामागे गेल्या दोन वर्षात चांगले काम झाले नाही, असे कोणाला वाटते काय, याचीही चर्चा सुरू झाली आहे.विरोधी नगरसेवकांना आॅफरनगरपरिषदेतील सत्ताधारी सेनेच्या काही नेत्यांकडून विरोधकांमधील दोन नगरसेवकांना एका गुप्त बैठकीत मोठी आॅफर देण्यात आल्याची चर्चा आहे. दोनपैकी एकाला उपनगराध्यक्षपदाची आॅफर मिळाली आहे. तसेच या काळात नगराध्यक्ष पंडित यांना सक्तीच्या रजेवर पाठवून कारभार उपनगराध्यक्षांकडे ठेवण्याचीही खेळी आहे.

मात्र, नगराध्यक्ष केवळ दोन महिन्यांसाठीच सक्तीच्या रजेवर जाऊ शकतात. त्यामुळे केवळ उपनगराध्यक्षपदाची खुर्ची मिळविण्यात कोणतेही स्वारस्य नाही, असे या दोन्ही नगरसेवकांकडून सांगितले जात आहे. या खेळीने नेमके काय साध्य होणार, याबाबतही तर्क वितर्क सुरू आहेत. 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षRatnagiriरत्नागिरी