शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रत्नागिरी नगरपरिषदेचे दीडशे कोटींचे अंदाजपत्रक मंजूर, अनेक विकासकामांसाठी अंदाजपत्रकात निधीची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 17:44 IST

रत्नागिरी नगर परिषदेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या शिलकी अंदाजपत्रकाला शुक्रवारच्या विशेष सभेत चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १५१ कोटी १० लाख ३३ हजार ७८३ रुपये जमेचे व १४८ कोटी ८ लाख ३२ हजार खर्चाचे आणि ३ कोटी २ लाख १७८३ रुपये शिल्लक दाखवणारे अंदाजपत्रक सभागृहात मंजूर करण्यात आले. शहरातील तारांगण, स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या आधुनिकीकरणासह अनेक विकासकामांसाठी या अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसावरकर नाट्यगृहाच्या आधुनिकीकरणासह येत्या आर्थिक वर्षात ५० लाख रुपयांची तरतूद रत्नागिरी नगर परिषदेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या शिलकी अंदाजपत्रकाला शुक्रवारच्या विशेष सभेत चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १५१ कोटी १० लाख ३३ हजार ७८३ रुपये जमेचे व १४८ कोटी ८ लाख ३२ हजार खर्चाचे आणि ३ कोटी २ लाख १७८३ रुपये शिल्लक दाखवणारे अंदाजपत्रक सभागृहात मंजूर करण्यात आले. शहरातील तारांगण, स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या आधुनिकीकरणासह अनेक विकासकामांसाठी या अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आली आहे.सभेच्या सुरुवातीलाच २०१८-१९ च्या अंदाजपत्रकात नेमकेपणाने कोणत्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे व निधीची तरतूद करण्यात आली आहे, याची माहिती नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सभागृहाला दिली. शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात काही प्रमाणात दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. मात्र, अजून बरेचसे काम बाकी आहे. त्यामुळे या नाट्यगृहातील दुरुस्ती व आधुनिकीकरणासाठी येत्या आर्थिक वर्षात ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.सभेच्या विषयपत्रिकेत नमूद अंदाजपत्रकाच्या रकमेमध्ये तफावत दिसून येत होती. प्रत्यक्षात ७ कोटीची शिल्लक दिसून येत आहे, याकडे राष्ट्रवादीचे नगरसेवक सुदेश मयेकर यांनी लक्ष वेधेले. मात्र, अनवधानाने ती चूक झाली असून, प्रत्यक्षात तीन कोटी एवढीच शिल्लक दाखवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

शहरात ९ कब्रस्थाने व ३ स्मशानभूमींचे आधुनिकिकरण केले जाणार असून, लिंगायत समाजासाठी राखून ठेवलेल्या जागेत स्मशानभूमी उभारली जाणार आहे. रत्नागिरी शहरात पर्यटकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध प्रकल्प राबविले जाणार आहेत. यापैकीच किल्ला परिसरातील जागेत राज्यातील ९ जलदुर्ग व राजधानी रायगड या किल्ल्यांच्या प्रतिकृती तसेच ऐतिहासिक महत्त्वाच्या प्रसंगांची शिल्प उभारली जाणार आहेत.यावेळच्या चर्चेत नगरसेवक रोशन फाळके यांनी अग्नीशमन इमारतीच्या स्थितीची पाहणी करून सुधारणा करण्याची मागणी केली. सावरकर नाट्यगृह चालवायला दिल्यास नगर परिषदेला अधिक फायदा होईल, अशी भूमिका नगरसेवक उमेश कुलकर्णी यांनी मांडली. विविध प्रभागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अंदाजपत्रकात ४ कोटींची तरतूद केल्याची माहिती यावेळी नगराध्यक्ष पंडित यांनी दिली.शहरालगतच्या पानवल येथील धरणाच्या दुरुस्तीसाठीही विकास आराखडा बनवला जाणार आहे. सभागृहातील चर्चेत सेना गटनेते बंड्या साळवी, नगरसेवक राजेश तोडणकर, समीर तिवरेकर, विकास पाटील, किशोर मोरे, निमेश नायर, सुशांत चवंडे आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी