शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

रत्नागिरी : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्राला ठोकले मनसेने टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:40 IST

कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी रात्री ९.३० वाजता विंचूदंशाचा रुग्ण आणला असता, त्याठिकाणी डॉक्टर किंवा कर्मचारी कोणीही उपस्थित नसल्याने अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी चक्क या आरोग्य केंद्रालाच टाळे ठोकत निषेध नोंदवला.

ठळक मुद्देकडवई प्राथमिक आरोग्य केंद्राला ठोकले मनसेने टाळे चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर टाळे काढण्याचा निर्णय

आरवली : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी रात्री ९.३० वाजता विंचूदंशाचा रुग्ण आणला असता, त्याठिकाणी डॉक्टर किंवा कर्मचारी कोणीही उपस्थित नसल्याने अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी चक्क या आरोग्य केंद्रालाच टाळे ठोकत निषेध नोंदवला. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर वैद्यकिय अधिकारी कदम यांनी विनंती केल्यानंतर अखेर रात्री उशीरा टाळे खोलण्यात आले.बुधवारी रात्री तुरळ चोबारवाडी येथील विंचूदंशाचा रुग्ण कृ ष्णा पाचकले यांना येथे आणले असता केंद्राच्या दरवाजाला कडी आढळून आली. ग्रामस्थांनी ही बाब मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या कानावर घातली. चव्हाण यांनी प्रत्यक्ष पहाणी केली असता तेथे डॉक्टर किंवा कर्मचारी कोणीच नसल्याचे दिसले. त्यानंतर चव्हाण यांनी संबंधित रुग्णाला खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी हलविले आणि तासभर वाट पाहिली. मात्र कोणीही दिसून न आल्याने अखेर त्यांंनी आरोग्य केंद्राला टाळे ठोकून या गोष्टीचा निषेध व्यक्त केला.

याचवेळी ह्युमिनीटी युनाटेड फेडरेशनचे कोकण विभागाचे अध्यक्ष सचिन शिंदे, रुपेश सावंत, सतिश राणे हे पदाधिकारी या भागात आपल्या खासगी कामासाठी आले असता त्यांना या घटनेची माहिती मिळताच ते ही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीची माहिती घेऊन ही बाब तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी आठल्ये यांच्या कानी घालण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी रायभोळे यांना भ्रमणध्वनीवर याबाबतची माहिती देण्यात आली.रुग्णकल्याण समिती अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांना घटनेची खबर मिळताच त्यांनी चव्हाण यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती घेतली. घटनेची खबर मिळताच परिसरातील ३० ते ४० ग्रामस्थ याठिकाणी जमा झाले होते.संबंधित वैद्यकिय अधिकारी यांचे निवासस्थानाची पहाणी केली असता निवासस्थानाच्या बाहेरील मुख्य दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. यावेळी याठिकाणी पांढऱ्या रंगाच्या दोन पिशव्यांमध्ये २५ ते ३० दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या.या सर्व घटनांची पंचयादी सर्व उपस्थितांच्या समक्ष आणि कर्मचाऱ्यांच्या सहीने घालण्यात आली. त्याचवेळी ड्युटीवर असणाºया वैद्यकिय अधिकारी कदम येथे हमर झाल्या मात्र कोणतीही चर्चा न करता निघून गेल्या.

तासाभराने कदम यांनी जितेंद्र चव्हाण यांना टाळे काढण्याची विनंती केली. त्यानंतर रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर रात्री उशीरा चव्हाण यांनी टाळे काढण्याचा निर्णय घेतला. जिल्हा आरोग्य अधिकारी आठल्ये यांनी यावर समक्ष भेट देऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आपण टाळे काढण्याचा निर्णय घेत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केंद्रावर लाखो रुपये खर्च होऊनही शवविच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात जावे लागत असल्याने मृतांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होत आहे. आरोग्य केंद्र परिसरात वाढलेले गवताचे जंगल मात्र तसेच असल्याने या परिसरात फिरणे धोकादायक बनले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या दोन डॉक्टर कार्यरत आहेत. त्यामुळे पूर्वी एकच डॉक्टर असताना रुग्णाच्या होणाऱ्या तक्रारी आता कमी होणे गरजेचे आहे. मात्र तसे न होता या तक्रारी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहेत. याबाबत तक्रार केली असता आपली नियुक्ती रद्द करुन घेण्याच्या धमक्या देत असल्याने ग्रामस्थ तक्रार करण्यास धजावत नसल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :MNSमनसेRatnagiriरत्नागिरी