शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

रत्नागिरी : कंपनीच्या अधिकाऱ्यांना पळवून लावू,  विनायक राऊत यांचा रिफायनरीच्या अधिकाऱ्यांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 5:40 PM

नाणारमधील प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून रिफायनरीबाबतचा निर्णय घेऊ, असे आश्वासन देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता प्रकल्प परिसरात येऊन जनतेची भेट घ्यावी. प्रकल्पाबाबत असलेले जनमत लक्षात घेऊन तेथेच झटपट निर्णय घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांना भेटून करणार असल्याची माहिती शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत यांनी राजापुरात दिली.

ठळक मुद्देकंपनीच्या अधिकाऱ्यांना पळवून लावूविनायक राऊत यांचा रिफायनरीच्या अधिकाऱ्यांना इशारा- मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी येऊन जनमताची चाचणी घ्यावी

राजापूर : नाणारमधील प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून रिफायनरीबाबतचा निर्णय घेऊ, असे आश्वासन देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता प्रकल्प परिसरात येऊन जनतेची भेट घ्यावी. प्रकल्पाबाबत असलेले जनमत लक्षात घेऊन तेथेच झटपट निर्णय घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांना भेटून करणार असल्याची माहिती शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत यांनी राजापुरात दिली.

जनतेची दिशाभूल करणाऱ्या रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल कंपनीशी कुठलीच चर्चा करणार नसल्याचे सांगताना संबंधीत कंपनीचे अधिकारी नाणार परिसरात जनतेला भेटण्यासाठी आले तर त्यांना पळवून लावू, असा इशाराही त्यांनी दिला.रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा सुरूवातीपासून कडाडून विरोध आहे. या प्रकल्पाविरोधात संघर्ष करणारे भाई सामंत यांच्या समवेत शिवसेना असून, आम्ही जनतेसमवेत असल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. नाणार परिसरातील चौदा गावांचा या प्रकल्पाला विरोध असताना रत्नागिरी रिफायनरी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन रिफायनरीला फक्त चौदा टक्के जनतेचा विरोध असल्याचे विधान केले होते, त्याचा त्यांनी समाचार घेतला. वेळेप्रसंगी रत्नागिरीमधील कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चाही काढू, असा इशारा त्यांनी दिला.पत्रकार परिषदेला आमदार राजन साळवी, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, जिल्हा परिषद शिक्षण सभापती दीपक नागले, सभापती सुभाष गुरव, शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष व कोकणचे संघटक दिनेश जैतापकर उपस्थित होते....तर गाशा गुंडाळावाजनता प्रकल्पाच्या बाजूने असल्याचे दिसून आले तर त्याच क्षणी भूमिपूजनाचा कार्यक्रम करून घ्या आणि स्थानिक जनतेचा विरोध असल्याचे दिसून आले तर प्रकल्पाचा गाशा गुंडाळावा, असे ते म्हणाले.प्रकल्पग्रस्तांसाठी बैठककोकण रेल्वेबाबत प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या आहेत त्यासाठी दिनांक १९ एप्रिलला रत्नागिरीत कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी गुप्ता यांच्याशी बैठक आयोजित केली आहे, अशी माहितीही दिली.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Ratnagiriरत्नागिरी