शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : बेशिस्त पार्किंगला जॅमर, वाहतूक शाखेची धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 16:03 IST

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही दिवसांपूर्वीच शासकीय आणि खासगी व्यक्तींसाठी वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, तरीही बेशिस्तपणे वाहने लावली जात होती. मात्र, बुधवारपासून या परिसरात शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई मोहीम राबविण्यात येत असल्याने बेशिस्त पार्किंगला चाप बसू लागला आहे. दरम्यान, या दोन दिवसांत ५० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देचालकांना शिस्त लागेपर्यंत कारवाई सुरूच राहणारवाहतूक शाखेकडून कडक कारवाईचे धोरण, सहकार्याचे आवाहन.

रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही दिवसांपूर्वीच शासकीय आणि खासगी व्यक्तींसाठी वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, तरीही बेशिस्तपणे वाहने लावली जात होती. मात्र, बुधवारपासून या परिसरात शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई मोहीम राबविण्यात येत असल्याने बेशिस्त पार्किंगला चाप बसू लागला आहे. दरम्यान, या दोन दिवसांत ५० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन इमारतींसह, प्रांत कार्यालय तसेच अन्य कार्यालयेही आहेत. या कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांकडून दुचाकी तसेच चारचाकी वाहने वाट्टेल तशी लावली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. या परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात शासकीय वाहने तसेच खासगी वाहने यांच्यासाठी वाहतूक व्यवस्था नियोजित करण्यात आली आहे.गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी तसेच नागरिकांच्या खासगी वाहनांसाठी निश्चित केलेल्या ठिकाणांवर ह्यनो पार्किंगह्णचे फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, तरीही नागरिक त्याच्यासमोरच आपली वाहने दामटवून लावत होते. त्यामुळे प्रशासनाला ही डोकदुखी ठरत होती.अखेर या बेशिस्त वाहतुकीला आळा बसण्यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी शहर वाहतूक शाखेला या बेशिस्त पार्किंगवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या शाखेचा पदभार नुकताच स्वीकारलेले पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या नेतृत्वाखाली बुधवारपासून या परिसरात कडक कारवाईला प्रारंभ झाला आहे.

नो पार्किंग झोनमध्ये लावलेल्या वाहनांना जॅमर लावण्यात येत असून, २०० रूपयांचा दंड आकारला जात आहे. याठिकाणी कडक कारवाई करण्यास सुरुवात झाल्याने आता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणाऱ्या वाहनांच्या गर्दीला शिस्त लागणार आहे.या परिसरातील वाहनव्यवस्था सुरळीत होईपर्यंत ही कारवाई करण्यात येणार असल्याचे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले. शहरात बेशिस्तपणे वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहनचालकांनी ह्यनो पार्किंगह्णमध्ये वाहने उभी न करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी केल्या आहेत.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसRatnagiriरत्नागिरी