शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : वैशाख वणव्यामुळे नागरिकांना जगणे असह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 16:28 IST

वैशाख वणवा सुरु झाल्याने एकूणच वातावरण कमालीचे तापले आहे. वाढत्या उष्म्यामुळे व पर्यावरणातील बदलामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून, उष्म्यामुळे सामान्य माणसाचे जगणे अशक्य झाले आहे.

ठळक मुद्देवैशाख वणव्यामुळे नागरिकांना जगणे असह्यवाढत्या उष्म्यामुळे, पर्यावरणातील बदलामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही

चिपळूण : वैशाख वणवा सुरु झाल्याने एकूणच वातावरण कमालीचे तापले आहे. वाढत्या उष्म्यामुळे व पर्यावरणातील बदलामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून, उष्म्यामुळे सामान्य माणसाचे जगणे अशक्य झाले आहे.मार्च महिन्यापासूनच कोकणात ऊन वाढायला लागते. त्याचे चटके असह्य होतात. वैशाख महिना सुरु झाला आणि उन्हाची तीव्रता अधिकच जाणवू लागली. सकाळी सूर्याची किरणे थेट अंगावर घेणे अवघड होऊ लागले. दुपारी तर सगळीकडे रखरखाट असतो. यावेळी रस्त्यावरुन चालणेही अवघड होते.

भाताची मशागत सुरु झाली असून, झाडेही अद्याप उघडी, बोडकी आहेत. त्यामुळे उष्णतेची झळ सहज शरीराला पोहोचते. दुपारच्यावेळी गरम वाफांनी घरात स्वस्त बसणेही अवघड होते. अशावेळी रस्त्यावरुन चालणे हे दिव्यच असते. सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वातावरण कमालीचे तापलेले असते. उकाड्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.वाढत्या उष्म्यामुळे गेले तीन ते चार दिवस वातावरणात मोठा बदल झाला आहे. मंगळवारी सायंकाळी चिपळूण तालुक्यात वादळी पाऊस पडल्यामुळे उष्णता अधिकच वाढली आहे.

हा वैशाख वणवा असाच सुरु राहिला आणि तापमान अधिकाधिक वाढत राहिले तर उष्णतेची लाट येऊ शकते. त्याचा परिणाम मानवी आयुष्यावर होऊ शकतो. उष्म्यामुळे शीतपेय, कलिंगड किंवा थंड पदार्थांना मागणी वाढली आहे. त्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTemperatureतापमान