शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

डॉक्टरांच्या साहित्य संमेलनात रत्नागिरीची छाप

By admin | Updated: March 2, 2016 23:57 IST

पहिलेच संमेलन : विविध समस्यांवर ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’

रत्नागिरी : इंडियन मेडिकल असोसिएशनने धुळे येथे आयोजित केलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या (अ‍ॅलोपॅथी) पहिल्या राष्ट्रव्यापी साहित्य संमेलनात रत्नागिरी ‘आय. एम. ए’च्या चमूने डॉक्टरांच्या समस्येवर ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ ही नाटिका सादर करून वेगळी छाप पाडली.डॉ. अलका मांडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या वैद्यकीय साहित्य संमेलनाचे प्रसिद्ध नाटककार गंगाराम गवाणकर प्रमुख अतिथी होते. यावेळी ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ या नाटिकेचे लेखक डॉ. नीलेश नाफडे, दिग्दर्शक डॉ. निनाद नाफडे, डॉ. शशांक पाटील, डॉ. मतीन परकार, डॉ. महेश भोगटे यांनी ही नाटिका सादर केली. अखंड मेहनतीने डॉक्टर झाल्यानंतर एक नवीन डॉक्टर दवाखाना सुरू करतो. मात्र, गर्भलिंग चाचणीला कायद्याने विरोध असल्याने त्यावर लक्ष ठेवण्यास आलेली मंडळी त्याला नानाविध सल्ले देतात. जसे की, सूचनापाट्या रूग्ण तपासणी करण्यासाठी झोपल्यानंतरही त्याला दिसायला हव्यात, अगदी डॉक्टरने पेन कुठल्या खिशाला लावलेय त्यावरून स्त्री - पुरूष गर्भाबाबत सूचक इशारा देऊ शकते, करत नसलेल्या कामासाठीही (उदा. गर्भपात) एक वेगळे रजिस्टर अशा असंख्य सूचनांनी तो डॉक्टर बेजार होतो. त्यातच राजकारण्यांची फुकट सेवा मिळण्यासाठीची धडपड, दादागिरी, रूग्णांचे वेगवेगळे प्रकार, सोसायटीच्या सेक्रेटरीची जादा पाणी वापरल्याची, रूग्णांनी वेड्यावाकड्या पद्धतीने गाड्या लावण्याची तक्रार यातून त्या नव्या डॉक्टरची उडणारी तारांबळ या नाटिकेत सादर करण्यात आली आहे. थोडक्यात डॉक्टरांची दशा आणि व्यथा यात मांडण्यात आली आहे. केवळ प्रामाणिकपणे व्यवसाय करून उपयोग नाही, तर समाजाची व्यवस्थित हाताळणी करू शकणारे कसबी, व्यवहारी डॉक्टर हवेत. अन्यथा ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ असे म्हणण्याची पाळी येईल. तसेच चांगली सेवा मिळण्यासाठी समाजाच्या सहकार्याची गरज असते, हा संदेश या नाटिकेतून देण्यात आला.उत्कृष्ट लेखन, प्रभावी सादरीकरण आणि सर्व कलाकारांचा सहजसुंदर अभिनय यामुळे रत्नागिरीच्या ‘आय. एम. ए’ ग्रुपने या संमेलनात बाजी मारली. नाफडेबंधूंच्या वेगवेगळ्या विषयावरील ‘चारोळ्या’ चांगल्याच भाव खाऊन गेल्या. दोन दिवस चाललेल्या या डॉक्टरांच्या साहित्य संमेलनात पुस्तकामागचे डॉक्टर, कवीसंमेलन, नाटिका असे विविध कार्यक्रम रंगले. या संमेलनात डॉक्टरांनी लिहिलेल्या सात पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले. (प्रतिनिधी)