शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

रत्नागिरीत मध्यरात्री आगीत घर जळून १३ लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 13:07 IST

Fire Ratnagiri- रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे येथील बोरसई मोहल्ला येथील घराला शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत संपूर्ण घर खाक झाले. या आगीत तीन कुटुंबांचे सुमारे १३ लाख ७० हजारांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत मध्यरात्री आगीत घर खाक सैतवडे येथील दुर्घटना, सुमारे १३ लाखाचे नुकसान

रत्नागिरी : तालुक्यातील सैतवडे येथील बोरसई मोहल्ला येथील घराला शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत संपूर्ण घर खाक झाले. या आगीत तीन कुटुंबांचे सुमारे १३ लाख ७० हजारांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.सैतवडे बोरसई मोहल्ला येथील घराला शनिवारी मध्यरात्री अचानक आग लागली. आग लागल्याचे आजूबाजूच्या लोकांना कळताच त्यांनी घराकडे धाव घेतली. हे घर सामायिक असून, आगीतील सर्व सामान खाक झाले. मन्सूर हुसेन महंमदअली खलपे यांच्या घरात त्यांची बहीण मैमुना या राहतात. आग लागल्याचे कळताच त्या घरातून बाहेर पडल्याने वाचल्या.

या आगीत त्यांचे ४,५०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. अमिना महामूद खलपे या मुंबईला राहत असल्याने त्यांचे घर बंद होते. मात्र, आगीत त्यांचे ४,७०,००० रूपयांचे नुकसान झाले आहे. तर अब्दुल अजीज इसाक खलपे हे रत्नागिरीत राहत असल्याने त्यांचे घरही बंद होते. आगीमुळे त्यांचे ४,५०,००० रुपयांचे नुकसान झाले.घराला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी जयगड येथील पोर्ट, एनर्जी, चौघुले कंपनी येथील अग्निशमन दल, जयगड खंडाळा पोलीस, सैतवडे सरपंच सागर कदम, गुंबद सरपंच उषा सावंत, मुनाफ वागळे, अजिम चिकटे, साजिद शेकासन, अनिकेत सुर्वे, बानू खलपे, राजेश पालशेतकर, बोरसई ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले. रात्री उशिराने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.या आगीबाबत जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा जाधव यांनी रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांना रात्रीच फोनवर माहिती दिली. त्यानंतर रविवार सकाळी आगीचा पंचानामा करण्यात आला.

टॅग्स :fireआगRatnagiriरत्नागिरी