शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : केरळवासियांच्या मदतकार्यात साखरपाच्या जवानाची प्राणांची बाजी, बचावकार्य सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 15:35 IST

साखरपा (ता. संगमेश्वर) गावचा सुपुत्र आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा जवान कौस्तुभ फुटाणे आपल्या पथकासोबत केरळ येथे मदत कार्यात गुंतला आहे.

ठळक मुद्दे केरळवासियांच्या मदतकार्यात साखरपाच्या जवानाची प्राणांची बाजी, बचावकार्य सुरुअनंत अडचणींवर मात करत नागरिकांचे जीव वाचवण्याची धडपड

शोभना कांबळेरत्नागिरी : देवभूमी मानल्या जाणाऱ्या केरळच्या मदतीला महाराष्ट्रही धावला असून साखरपा (ता. संगमेश्वर) गावचा सुपुत्र आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा जवान कौस्तुभ फुटाणे आपल्या पथकासोबत मदत कार्यात गुंतला आहे. पावसामुळे मदत कार्यात अनेक अडथळे येत असल्याने या पथकाचे मदत कार्य सुरूच आहे.केरळमध्ये राज्याच्या अनेक भागात महापूर आला आहे. केरळमधील या अस्मानी संकटाने सुमारे ३५० बळी घेतले आहेत. पावसाचा जोर कमी न झाल्याने येथील नद्यांना आलेल्या महापुराने या राज्यात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रानेही या राज्याच्या मदतीसाठी धाव घेतली आहे.

महाराष्ट्राचे पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे २५ जवानांचे पथक १६ आॅगस्टपासून केरळ राज्यात दाखल झाले आहे. कमांडर राजेश यावले यांच्या नेतृत्त्वाखालील या पथकात साखरपा येथील कौस्तुभ फुटाणे या जवानाचा समावेश आहे.कौस्तुभ साखरपा येथील ज्येष्ठ छायाचित्रकार रविकांत फुटाणे यांचा सुपुत्र. वैद्यकीय चाचणीत थोड्याच गुणांनी अपयश आलेल्या कौस्तुभची निवड मिलिटरीसाठी झाली नाही. पण, तरीही उमेद न हारता त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. त्यामुळे अखेर त्यांची निवड पुणे तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय राखीव पोलीस दलात (उ. फ. ढ. ऋ.) झाली. त्यानंतर त्यांची नियुक्ती सहा महिन्यांसाठी चेन्नई येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली. तिथून थेट काश्मीरमध्ये बारामुल्ला सेक्टर येथे पाठविण्यात आले. सात वर्षे त्यांनी या ठिकाणी सेवा केली.पर्वा न करता मदतकार्यगेल्या दीड वर्षापासून कौस्तुभ फुटाणे पुणे येथील एनडीआरएफ या दलात कार्यरत आहेत. केरळमध्ये सध्या पावसाने हाहाकार माजविला असल्याने कौस्तुभ फुटाणे यांच्यासह २५ जणांचे पथक केरळमधील अलपुझा जिल्ह्यातील चेंगनूर तालुक्यात जिवाची पर्वा न करता दिवस-रात्र मदतकार्यात गुंतले आहे.पावसाचा जोरसंपूर्ण घरे पाण्यात बुडाली असल्याने घरातील व्यक्तिंना वाचविण्यासाठी या पथकाला खडतर परिश्रम घ्यावे लागत आहेत. त्यातच पावसाचा जोर असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. तरीही अनेक लोकांना पुरातून बाहेर काढून सुरक्षितस्थळी सोडण्यात आले आहे, अन्यथा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता होती.गतवर्षी बिहारला मदतसध्या थोडासा पाऊस थांबला असल्याने मदतकार्याला वेग आला आहे. येथील परिस्थिती अतिशय बिकट असल्याने अजूनही काही दिवस या पथकाला थांबावे लागणार आहे. गतवर्षी बिहारमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीत मदतकार्य करण्यासाठी कौस्तुभ फुटाणे यांचे पथक त्या ठिकाणी कार्यरत होते. 

केरळमध्ये दहा - बारा फुटापर्यंत पाणी असल्याने या पाण्यातून नागरिकांना सुखरूप बाहेर काढणे व सुरक्षित ठिकाणी नेणे, हे महत्प्रयासाने करावे लागत आहे. पावसाचाही अडथळा आहेच. आज पाऊस थोडा कमी असल्याने काम थोडे सुकर झाले आहे. मात्र, येथील नागरिकांची भाषा बहुतांश मल्याळी असल्याने भाषेचा मोठा अडसर जाणवत आहे. मात्र, हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करत मदतकार्य सुरू आहे. अजून किती दिवस यासाठी लागतील, हे सांगता येत नाही.-कौस्तुभ फुटाणे,जवान (एन. डी. आर. एफ.)

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरRatnagiriरत्नागिरी