शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : ग्रामसेवक, गटविकास अधिकारी भ्रष्टाचार करतील, शिक्षक नाही : गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 15:14 IST

सर्वात नॉन करप्ट कोणी असेल तर तो शिक्षक आहे. कारण त्याच्याकडून भ्रष्टाचार होत नाही. ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, डीडीआर यांच्याकडून भ्रष्टाचार होईल, पण शिक्षकाकडून होणार नाही, असा विश्वास महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देग्रामसेवक, गटविकास अधिकारी भ्रष्टाचार करतील, शिक्षक नाही सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे रत्नागिरीत वक्तव्य

रत्नागिरी : सर्वात नॉन करप्ट कोणी असेल तर तो शिक्षक आहे. कारण त्याच्याकडून भ्रष्टाचार होत नाही. ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, डीडीआर यांच्याकडून भ्रष्टाचार होईल, पण शिक्षकाकडून होणार नाही, असा विश्वास महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.सहकार राज्यमंत्री पाटील हे रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या आरोग्य मंदिर येथे उभारण्यात आलेल्या नूतन वास्तूचे उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, शिक्षक हा देवता आहे.निवडणुकीत पोस्टलमध्ये मला सर्वात जास्त मते शिक्षकांची मिळतात, याचे कारण शिक्षक हा देवता आहे. पूर्वीच्या काळी मुलाने सांगितले शिक्षकाने मारले तर बाप काठी घेऊन जायचा आणि शिक्षकांना सांगायचा अजून मारा. आज तो शिक्षक आहे की नाही, हे मला माहीत नाही.ते पुढे म्हणाले की, येथे १०० टक्के गॅरंटी आहे की पगारामध्येच कटींग आहे. त्यामुळे शून्य टक्के थकबाकी आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ म्हणण्यापेक्षा तिच्या लग्नाला ५००० रुपये मदत केली तर हा सभासद तुमचा ऋणी राहील. त्याला वाटेल की ही संस्था माझ्या मागे उभी आहे. तुमच्या संस्थेकडून एखादा दवाखाना येथे उभा करावा. साडेतीन तासात कोल्हापूरला जाणाऱ्या रुग्णाचा जीव येथेच वाचला तर ती पुण्याई तुम्हाला मिळणार आहे.

६० कोटींमध्ये हा दवाखाना उभा राहिला तर तेथे शिक्षकांचीच मुले डॉक्टर म्हणून ठेवा. महामार्गावर कितीतरी लोक अपघातात जीव गमावतात. त्यामुळे तुम्ही दवाखाना उभारलात तर मला वाटेल की, मी या कार्यक्रमाला आल्याचे सार्थक झाले. यासाठी मी तुमच्या पाठीशी उभा आहे, असा दिलासा पाटील यांनी दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप महाडिक होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, जिल्हा उपनिबंधक बकुळा माळी, उपाध्यक्ष अनंत कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाध्यक्ष बंड्या साळवी, संचालक दिलीप देवळेकर उपस्थित होते.आमदार, खासदारांवर स्तुतीसुमनेसर्वात जास्त योजना आणणारे कोणी आमदार असेतील तर ते उदय सामंत आहेत. तर सर्वात गोड बोलणारे आणि सर्वात जास्त संपर्क ठेवणारे या देशातले खासदार असतील तर ते विनायक राऊत आहेत.बरेचवेळा खासदार सापडत नाहीत. दिल्ली टू गल्ली हा विषय संपतो. पण आमचे राऊत बघा गोड बोलणार, चांगलं बोलणार, अधिकाऱ्यांचा सन्मान करणार. पण आज आपण भलत्याच लोकांसमोर आलोय. हे लोक आपल्याला निवडून आणण्याची ताकद ठेवतात व पाडण्याचीही. ते जे ठरवतात, तो कार्यक्रम क्लियर असतो.शेतकऱ्याचा मुलगा-मुलगी कलेक्टर होणे कौतुकास्पदजेथे पैसे देण्याची दानत आहे तेथे नोटा घेऊन लोकं उभी आहेत. साईबाबांच्या मंदिरात लोक नोटा का टाकतात. तेथे देवच सुंदर आहे. देव लक्ष ठेवतो सर्वांवर. गुलाबरावांचा, राऊत साहेबांचा, सामंत साहेबांची मुलं एमपीएसस्सी, युपीएसस्सी झाली मोठे कौतुक नाही. मुलांना घडवणाऱ्या शिक्षकाचा, शेतकऱ्याचा मुलगा-मुलगी कलेक्टर होणे कौतुकास्पद असल्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

टॅग्स :ministerमंत्रीRatnagiriरत्नागिरी