शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

रत्नागिरी : दापोलीतील गॅसचे ऑफिस फोडले ; पाच लाख रोख, काही सामान चोरीला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 19:05 IST

 दापोली शहरातील फॅमिली माळ येथील मेहंदळे एच. पी. गॅस सर्व्हिसचे ऑफिस फोडून चोरट्याने 5 लाख रुपये रोख व नवीन रेग्युलेटर चोरल्या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. दापोली शहरातील मेहंदळे गॅस ऑफिस फोडल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली असून, दापोली पोलीस चोरट्याचा कसून शोध घेत आहेत.

ठळक मुद्देचोरटे दोन किंवा दोन पेक्षा अधिक असण्याची शक्यता   दापोली पोलिसात ऑफिस फोडल्याची फिर्याद सेटरचे कुलूप तोडून ऑफिसमध्ये प्रवेश तिजोरी फोडून 5 लाख रुपये रोख, सिलेंडरचे रेग्युलेटरची चोरी

दापोली : दापोली शहरातील फॅमिली माळ येथील मेहंदळे एच. पी. गॅस सर्व्हिसचे ऑफिस फोडून चोरट्याने 5 लाख रुपये रोख व नवीन रेग्युलेटर चोरल्या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.     दापोली शहरातील फॅमिली माळ येथे  अपर्णा अशोक मेहंदळे या वितरकांचे एच पी गॅस सर्व्हिसचे ऑफिस आहे. या ठिकानाहून सिलेंडरचा सप्लाय व आर्थिक व्यवहार चालविले जातात. रोजची सिलेंडरची रक्कम या ऑफिसमध्ये जमा केली जाते. 

3 वाजण्यापूर्वी सिलेंडरची जमा झालेली रक्कम बँकेत जमा केली जाते, मात्र त्यानंतर जमा होणारी रक्कम ऑफिस मध्ये ठेवली जात होती, ही रक्कम दुस-या दिवशी बँकेत जमा केली जायची.  20 रोजी नेहमी प्रमाणे सिलेंडरची जमा झालेली रक्कम  फॅमिली माळ येथील ऑफिसच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आली होती.  मात्र बुधवारी रात्री चोरट्याने बाहेरील सेटरचे कुलूप तोडून ऑफिसमध्ये प्रवेश करून आतील तिजोरी फोडून चोरट्याने 5 लाख रुपये रोख व सिलेंडरचे रेग्युलेटरची चोरी केली.      दापोली शहरातील फॅमिली माळ ही वस्ती गजबजलेली आहे, मात्र या ठिकाणी यापूर्वी सुद्धा सदनिका फोडून चोरट्याने चोरी केली होती. दरवर्षी या भागात चोरी होत असते, परंतु या पूर्वी झालेल्या चोरी किरकोळ स्वरूपाच्या होत्या.  मेहंदळे गॅस सर्व्हिस सेंटर हे रस्त्याला लागून आहे. अतिशय वर्दळीच्या रस्त्या लगतचे मेहंदळे यांचे एच. पी. गॅस ऑफिस फोडल्याने चोरटे महितीगार असण्याची शक्यता असून, चोरटे दोन किंवा दोन पेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे .      दापोली शहरातील मेहंदळे गॅस ऑफिस फोडल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली असून, दापोली पोलीस चोरट्याचा कसून शोध घेत आहेत. मेहंदळे गॅस ऑफिस शेजारी असणारे सगळे  फुटेज तपासून पोलीस चोरीचा छडा लावण्याचा प्रयत्न करणार आहेत. पोलीसांना चोरांच्या मुसक्या आवळण्यात यश येतेय का ? पुढील तपासातून निष्पन्न होणार आहे

टॅग्स :Dapoli Police Thaneदापोली पोलीस ठाणेCrimeगुन्हा