शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : देवरूख नगरपंचायतीच्या सहा प्रभागांमध्ये चौरंगी लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 17:02 IST

देवरुख नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगताना दिसत आहे. नगरपंचायतीची निवडणूक चौरंगी की तिरंगी होणार, याची समिकरणे मांडली जात होती. या निवडणुकीत १६ प्रभागांपैकी ६ प्रभागांमध्ये चौरंगी लढत होत आहे.

ठळक मुद्देदेवरूख नगरपंचायतीच्या सहा प्रभागांमध्ये चौरंगी लढती प्रचाराची रणधुमाळी, आगामी निवडणुकांवर परिणाम

सचिन मोहितेदेवरुख : देवरुख नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगताना दिसत आहे. नगरपंचायतीची निवडणूक चौरंगी की तिरंगी होणार, याची समिकरणे मांडली जात होती. या निवडणुकीत १६ प्रभागांपैकी ६ प्रभागांमध्ये चौरंगी लढत होत आहे.देवरुख शहरातील १६ प्रभागांपैकी ६ प्रभागांमध्ये चौरंगी लढत होत आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १, ३, ७, १२, १५ व १६ यांचा समावेश आहे. तर अन्य काही प्रभागांमध्ये तिरंगी तसेच अपक्षांमुळे पंचरंगी लढती होत आहेत. प्रभाग १ मध्ये राष्ट्रवादी आघाडी, सेना, भाजप व स्वाभिमान अशी चौरंगी लढत होत आहे.

राष्ट्रवादीसाठी हा प्रभाग प्रतिष्ठेचा आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार देवेंद्र पेंढारी यांच्यासाठी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम व चिपळूणच्या सभापती पूजा निकम प्रचारात भाग घेणार आहेत. भाजप-मनसे युती आणि सेना व स्वाभिमानी अशी मते विभागली जाणार आहेत.

यापूर्वी २०१३च्या निवडणुकीत सेना व भाजप युतीला यश मिळाले होते. मात्र, यावेळी स्थिती उलट आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या देवेंद्र पेंढारी यांना विजया समीप जाणे शक्य होणार आहे. सेनेकडून प्रकाश मोरे रिंगणात असून, त्यांचाही प्रभागात दांडगा संपर्क आहे. भाजपकडून संदीप वेलवणकर व अपक्ष तथा स्वाभिमानचे संजय परकर हे प्रभाग १ मधून आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत.प्रभाग ३ मध्ये नगरसेवक दादा शिंदे यांच्या पत्नी सुवर्णा शिंदे सेनेकडून, भाजपकडून रेश्मा किर्वे, राष्ट्रवादीकडून दीपाली करंडे तर अपक्ष श्रध्दा भोसले रिंगणात आहेत. दादा शिंदे यांचा प्रभागात संपर्क असला तरी त्यांनी गत पाच वर्षात दिलेल्या योगदानाचा विचार निवडणुकीत होणार आहे.

प्रभाग ७ हादेखील विशेष लक्षवेधी ठरणार आहे. कारण याठिकाणी भाजपला सोडचिठ्ठी देऊन सेनेत दाखल झालेले नगरसेवक दत्ताराम कांगणे सेनेतून, भाजपकडून सुशांत मुळ्ये, काँग्रेसकडून जितेंद्र भुवड आणि अपक्ष तेजश्री मुळ्ये अशी लढत होत आहे. प्रभाग १२ मध्ये सेनेकडून देवेंद्र शेट्ये, मनसेकडून सान्वी संसारे, अपक्ष सोनिया धामणस्कर आणि काँग्रेसकडून रिया शेट्ये आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत.

याखेरीज प्रभाग १५ मध्ये सेनेकडून निधी कापडी, मनसेकडून पूजा मांगले, राष्ट्रवादीकडून रुक्साना बोदले, अपक्ष प्रणाली विंचू यांच्यात लढत होत आहे. प्रभाग १६ मध्ये सेनेकडून विलास केदारी, राष्ट्रवादीकडून वसंत तावडे, भाजपकडून राजेंद्र गवंडी, अपक्ष दीपक खेडेकर हे निवडणूक रिंगणात आहेत.आगामी निवडणुकांवर परिणामसंगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहर हे तालुक्याच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण आहे. नगरपंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. ही निवडणूक २०१९च्या विधानसभा निवडणुकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम करणारी ठरणार आहे.स्वाभिमानदेखील रिंगणातकाँग्रेस, राष्ट्रवादी व इतर मित्रपक्षांनी आघाडी केली आहे. तर शिवसेना स्वतंत्रपणे लढत आहे. याबरोबरच भाजप व मनसे हे एकत्रित लढत असून, स्वाभिमान पक्षदेखील निवडणूक रिंगणात आहे. मात्र, पक्षाने सर्वच प्रभागांमध्ये उमेदवार न दिल्याने चौरंगी लढत होणार नाही.

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक