शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : मुरुड किनाऱ्यावर पाच समुद्री कासवे मृतावस्थेत, समुद्रातील नैसर्गिक बदलांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 17:42 IST

दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी आॅलिव्ह रिडले जातीची ५ समुद्री कासवे मृतावस्थेत आढळली आहेत. या कासवांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण कळू शकलेले नाही.

ठळक मुद्देमुरुड किनाऱ्यावर पाच समुद्री कासवे मृतावस्थेतसमुद्रातील नैसर्गिक बदलांचा फटका

दापोली : तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी आॅलिव्ह रिडले जातीची ५ समुद्री कासवे मृतावस्थेत आढळली आहेत. या कासवांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण कळू शकलेले नाही.समुद्रातील नैसर्गिक बदलांचा फटका या कासवांना बसला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. मुरुड किनाऱ्यावर दुर्मीळ आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवांचा मृत्यू झाल्याने दापोली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.आॅलिव्ह रिडले जातीचे समुद्री कासव जीवसृष्टीतील महत्त्वाचा दुवा समजले जाते. दापोलीतील मुरुड - कर्दे - लाडघर, कोलथरे, दाभोळ, केळशी, आंजर्ले या स्वच्छ सुंदर समुद्र किनाऱ्यांवर ही कासवे अंडी घालण्यासाठी येतात. दरवर्षी किनाऱ्यावर हजारो अंड्यांचे संवर्धन करून त्यातून निघालेली पिले सुखरूप समुद्रात सोडली जातात.

दुर्मीळ होत जाणाऱ्या आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या संवर्धनाची जबाबदारी शासनाने घेतली असली तरीही मुरुड किनाऱ्यां वर मृतावस्थेत आढळलेल्या या जातीच्या कासवांमुळे शासनाच्या कासव वाचवा या मोहिमेबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे. या कासवांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण शोधण्याची मागणी होत आहे.

 

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDapoli Nagar Panchayatदापोली नगरपंचायत