शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : मासेमारी सुरु, पहिल्याच दिवशी अनेक नौका खोल समुद्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 16:14 IST

खोल समुद्रातील मासेमारीला सुरुवात झाली असली तरी अजूनही अनेक नौका किनाऱ्यावरच नांगरावर उभ्या आहेत़ मात्र, पारंपरिक व छोटे मच्छीमार पहिल्याच दिवशी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेले होते़

ठळक मुद्देमासेमारी सुरु, पहिल्याच दिवशी अनेक नौका खोल समुद्रात अजूनही अनेक नौका किनाऱ्यावरच

रत्नागिरी :  खोल समुद्रातील मासेमारीला सुरुवात झाली असली तरी अजूनही अनेक नौका किनाऱ्यावरच नांगरावर उभ्या आहेत़ मात्र, पारंपरिक व छोटे मच्छीमार पहिल्याच दिवशी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेले होते़पावसाळ्यात १ जूनपासून खोल समुद्रातील मासेमारी पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून दरवर्षी देण्यात येतात़ त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी शासनाच्या मत्स्य खात्याकडून करण्यात येते. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी करणाऱ्या नौकांवर मत्स्य खात्याकडून कारवाई करण्यात येते़मिरकरवाडा, राजिवडा, साखरतर, काळबादेवी, जयगड, साखरीनाटे, दापोली तालुक्यातील हर्णै, दाभोळ या बंदरामध्ये पर्ससीन नेट, ट्रॉलिंग व पारंपरिक मच्छीमार मोठ्या प्रमाणात आहेत़ या बंदरांवर मासेमारीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते़ पावसाळा सुरु झाल्यानंतर खोल समुद्रातील मासेमारी बंद होती़ मात्र, मासेमारीवरून दि़ १ आॅगस्टपासून बंदी उठल्याने पारंपरिक मच्छीमारांनी समुद्रात जाण्यास सुरुवात केली़पहिल्याच दिवशी मासेमारी करून परतलेल्या नौकांना बांगडा, झिंगे अशा प्रकारचे मासे मिळाले़ मात्र, हे प्रमाण अत्यंत कमी होते़ मासेमारी सुरु झाल्याने आज राजिवडा, मिरकरवाडा, साखरतर ही बंदरे गजबजलेली होती़मासेमारीला शुभारंभ झालेला असला तरी पर्ससीननेट, ट्रॉलिंगने मासेमारी करणाऱ्या नौका अजूनही किनाऱ्यावरच आहेत. पर्ससीननेट नौकांना १ जानेवारीपर्यंत मासेमारी करण्यावर शासनाने बंदी घातलेली आहे़ अजूनही अनेक नौका मालक मासेमारीला जाण्यासाठी तयारी करीत आहेत. मासेमारी हंगाम सुरु झाल्याने मच्छीमारांनी समाधान व्यक्त केले़

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी