शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी :  फ्री वे शिपिंग कॉरिडॉरच्या विरोधात मच्छीमारांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 17:35 IST

गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत पश्चिम सागरी किनाऱ्यापासून १५ ते ३५ नॉटिकल मैलाच्या सागरी क्षेत्रात फ्री वे शिपिंग कॉरिडॉर उभारण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी मंगळवारी रत्नागिरी जिल्हा मच्छीमार कृती समिती आणि मच्छीमार संघ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता.

ठळक मुद्दे फ्री वे शिपिंग कॉरिडॉरच्या विरोधात मच्छीमारांचा मोर्चा मच्छीमार संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

रत्नागिरी : गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत पश्चिम सागरी किनाऱ्यापासून १५ ते ३५ नॉटिकल मैलाच्या सागरी क्षेत्रात फ्री वे शिपिंग कॉरिडॉर उभारण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी मंगळवारी रत्नागिरी जिल्हा मच्छीमार कृती समिती आणि मच्छीमार संघ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता.हे कॉरिडॉर झाल्यास पश्चिम किनाऱ्यांवरील १०० नॉटीकल मैलाच्या क्षेत्रात होणारी मासेमारी धोक्यात येईल व मासेमारी व्यवसायच संपुष्टात येण्याची भीती आहे. यामुळे देशभरातील सुमारे १० कोटी मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे या व्यापारी जलमार्गाच्या विरोधात मच्छीमारांनी आज देशव्यापी आंदोलन केले. रत्नागिरी जिल्हा मच्छीमार कृती समिती आणि मच्छीमार संघानेही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.शहरातील शनिवार बाजारपेठेतून हा मोर्चा सुरू झाला. हातात फलक घेतलेले मच्छीमार यात सहभागी झाले होते. यावेळी महाराष्ट्र कृती समितीचे उपाध्यक्ष अमजद बोरकर, रत्नागिरी जिल्हा मच्छिमार संघाचे अधय्क्ष बाबामिया मुकादम, नदीम सोलकर, अनिरूद्ध साळवी, मच्छीमार नेते आप्पा वांदरकर, दिलावर गोदड, प्रवीण दळवी, तबरेज सोलकर, राकेश मयेकर तसेच सुमारे ५० मच्छिमार उपस्थित होेते. यावेळी जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळातर्फे निवेदन सादर करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी हे निवेदन स्वीकारले.

टॅग्स :Fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी