शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

रत्नागिरी : राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मराठी रंगभूमीची एक्सपायरी डेट प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 17:15 IST

तळवडे बौद्धजन सेवा संघ, मुंबई व ग्रामीण तसेच भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा, तळवडे (ता. लांजा) यांच्या विद्यमाने महामानावांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मराठी रंगभूमी, रत्नागिरीच्या एक्सपायरी डेट ने प्रथम क्रमांक पटकावला.

ठळक मुद्दे एकांकिका स्पर्धेत मराठी रंगभूमीची एक्सपायरी डेट प्रथमपारितोषिके मिळवत स्पर्धेवर उमटवला ठसा

लांजा :  तळवडे बौद्धजन सेवा संघ, मुंबई व ग्रामीण तसेच भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा, तळवडे (ता. लांजा) यांच्या विद्यमाने महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मराठी रंगभूमी, रत्नागिरीच्या  एक्सपायरी डेट ने प्रथम क्रमांक पटकावला.उत्कृष्ट नेपथ्य प्रथम क्रमांक प्रवीण धुमक, प्रकाशयोजना प्रथम क्रमांक साई शिर्सेकर, उत्कृष्ट दिग्दर्शन द्वितीय क्रमांक ओंकार पाटील, वैयक्तिक उत्कृष्ट पुरूष अभिनय प्रथम क्रमांक स्वानंद मयेकर, उत्कृष्ट स्त्री अभिनय तृतीय क्रमांक ऋचा मुकादम अशी पारितोषिके मिळवत स्पर्धेवर आपला ठसा उमटवला.भारतीय संस्कृतीतील नीतीमूल्ये बाजूला सारून पाश्चात्य संस्कृतीचे आचरण करून मुलाने आपल्या वडिलांची निश्चित केलेली मृत्यूची वेळ व त्याची तयारी, देशप्रेमी वडिलांची मानसिकता प्रभावीपणे दाखवताना मानवी मूल्यांचे महत्व अधोरेखित करून समाजाला दिशा दाखवत ज्वलंत समस्यावर प्रकाश टाकणारी एकांकिका 'एक्सपायरी डेट'ने रसिकांच्या मनावर राज्य केले.

स्वानंद मयेकर, ऋचा मुकादम, अक्षय शिवगण, शिवानी जोशी, निशांत जाधव यांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय देत एकांकिका प्रथम क्रमांकावर नेवून ठेवली. या एकांकिकेने साऱ्यांची मने जिंकली.स्पर्धेत द्वितीय क्रमांक कला सार्थक ग्रुप, रत्नागिरीने सादर केलेली म्याडम, तर तृतीय क्रमांक माय माऊली, मुंबईने सादर केलेल्या सेल्फी एकांकिकेने मिळवला.

दिग्दर्शन प्रथम क्रमांक प्रतीक आंगणे, द्वितीय क्रमांक ओंकार पाटील, तृतीय क्रमांक मनोज भिसे, पुरूष अभिनय प्रथम क्रमांक स्वानंद मयेकर, द्वितीय क्रमांक नंदकुमार जुवेकर, तृतीय क्रमांक अनुप जाधव, स्त्री अभिनय प्रथम क्रमांक स्मितल चव्हाण, द्वितीय क्रमांक प्रतीक्षा सोनावणे, नेपथ्य द्वितीय क्रमांक चेतन घाणेकर, प्रकाशयोजना द्वितीय क्रमांक प्रतीक यशवंत, संगीत प्रथम क्रमांक गौरव बंडबे, द्वितीय क्रमांक स्नेह यश, विनोदी कलाकार निशांत जाधवची निवड करण्यात आली.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रमेश कदम, सुधाकर कदम, एन. बी. कदम, शोभा कदम, अशोक कदम, भिमदास कदम व इतर सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcultureसांस्कृतिक