शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत बनावट सेंद्रीय खतांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 13:50 IST

एमआयडीसी मिरजोळे येथील अ‍ॅम्बीशस फिश मिल प्रॉडक्ट कंपनीत धाड टाकून बनावट सेंद्रीय खताचा साठा जप्त करण्यात आला. जिल्हा गुणवत्ता नियंत्रक पथकाने टाकलेल्या धाडीत ५,७७१ पोती जप्त खत केले आहे. ४० किलोच्या एका पोत्याची किंमत ५५० रुपये असून, ३१ लाख ७४ हजार ५० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.

ठळक मुद्देरत्नागिरीत बनावट सेंद्रीय खतांचा साठा जप्त३१ लाख ७४ हजार ५० रुपयांचा माल हस्तगत

रत्नागिरी : एमआयडीसी मिरजोळे येथील अ‍ॅम्बीशस फिश मिल प्रॉडक्ट कंपनीत धाड टाकून बनावट सेंद्रीय खताचा साठा जप्त करण्यात आला. जिल्हा गुणवत्ता नियंत्रक पथकाने टाकलेल्या धाडीत ५,७७१ पोती जप्त खत केले आहे. ४० किलोच्या एका पोत्याची किंमत ५५० रुपये असून, ३१ लाख ७४ हजार ५० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.कंपनीचे मालक सिराज काझी यांनी २००६मध्ये सिटी कंपोस्टचा परवाना काढला होता. २००९ साली हा परवाना रद्द झाल्यानंतर तो पुन्हा काढण्यात आलेला नाही. याशिवाय कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारच्या यंत्रसामुग्रीशिवाय प्रयोगशाळा उपलब्ध नसताना ५ हजार ७७१ सेंद्रीय खताची पोती सापडली आहेत.राजापूर तालुक्यातील कशेळी येथे मंगळवारी तालुका पथकाने घातलेल्या धाडीमध्ये ३४२ बोगस सेंद्रीय खताची पोती जप्त केली होती. या खत विक्रेत्यांकडेदेखील कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे उघडकीस आले.

या नियंत्रण पथकामध्ये मिरजोळेच्या पोलीसपाटील समीक्षा पाडावे, सरपंच गणेश पाडावे, माजी सरपंच गजानन गुरव, ग्रामसेवक कृष्णकांत सावंत, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक जी. आर. मुरकुटे, जिल्हा कृषी अधिकारी आरीफ शहा, पंचायत समिती कृ षी अधिकारी विशाल जाधव, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, कृषी पर्यवेक्षक काशिनाथ बापट, कृ षी सहाय्यक व्ही. बी. नाडे यांचा समावेश होता. 

२००६ साली सिटी कंपोस्टचा परवाना काझी यांनी काढला होता. २००९ साली हा परवाना संपला असून, त्यानंतर कोणताही परवाना नसताना खत निर्मिती करुन विक्री सुरु होती. आतापर्यंत बोगस सेंद्रीय खतामध्ये सर्वांत मोठा साठा सापडला आहे. राजापूर तालुक्यामध्ये सुरु असलेल्या बोगस खतविक्रीमुळे कंपनीतील बोगस साठ्याकडे पोहोचणे शक्य झाले. शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.- आरीफ शहा,कृषी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी