शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : उकाड्याने हैराण झालेल्या नाट्यरसिकांनी नाटकच पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 13:49 IST

नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणा बंद असल्याने झालेल्या प्रचंड उकाड्यामुळे नाट्यरसिकांनी शनिवारी रात्री झालेला नाटकाचा प्रयोग मध्यंतरानंतर काही काळ थांबवला. वातानुकुलीत नाट्यगृहाची वातानुकूलित प्रयोगाची तिकिटे काढलेली असताना व तसे नाटकाच्या जाहिरातीत उल्लेख असतांना नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा बंद का ? असा प्रश्न विचारत प्रेक्षकांनी आयोजकांना धारेवर धरले तर, रत्नागिरी नगरपालिकेच्या व नगराध्यक्षांच्या नावाने शिमगा केला.

ठळक मुद्देउकाड्याने हैराण झालेल्या नाट्यरसिकांनी नाटकच पाडले बंदप्रयोग मध्यंतरानंतर काही काळ थांबवलाउमेश कामत, स्पृहा जोशी यांना संवाद साधावा लागला

रत्नागिरी : नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणा बंद असल्याने झालेल्या प्रचंड उकाड्यामुळे नाट्यरसिकांनी शनिवारी रात्री झालेला नाटकाचा प्रयोग मध्यंतरानंतर काही काळ थांबवला.

वातानुकुलीत नाट्यगृहाची वातानुकूलित प्रयोगाची तिकिटे काढलेली असताना व तसे नाटकाच्या जाहिरातीत उल्लेख असतांना नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा बंद का ? असा प्रश्न विचारत प्रेक्षकांनी आयोजकांना धारेवर धरले तर, रत्नागिरी नगरपालिकेच्या व नगराध्यक्षांच्या नावाने शिमगा केला.सुमारे दोन महिने नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणा बंद आहे, या आधी झालेल्या एका नाट्यप्रयोगाच्या वेळीही रसिकांनी तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली होती. मात्र, ही यंत्रणा सुरु करण्यास नगरपालिकेकडून विलंब होत होता.

आजवर हजारो नाटकांचे रत्नागिरीत यशस्वी आयोजन करणाऱ्या आयोजकांनादेखील नाट्यरसिकांच्या असुविधेमुळे दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. वातानुकूलित यंत्रणा या प्रयोगाआधी दुरुस्त होईल अशा नगरपालिकेच्या आश्वासनामुळेच आम्ही या नाटकाचा प्रयोग लावला अशी माहिती आयोजक किशोर सावंत यांनी दिली.नाट्यगृहातील असुविधा नाट्यगृहातील असुविधेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत रसिकांनी प्रयोग रोखल्यावर नाटकातील कलाकार उमेश कामत आणि स्पृहा जोशी यांना रसिकांसमोर येऊन संवाद साधावा लागला.

नगरपालिकेच्या या असुविधेमुळे रत्नागिरीचे नाव खराब होत आहे अशी खंत अनेक रसिकांनी व्यक्त केली. सुमारे दोन महिन्यांपासून नाट्यगृहातील जनरेटर बंद असल्याने वातानुकूलित यंत्रणा सुरु करता येत नाही, यामुळे नाट्यगृहात प्रचंड उकाडा होतो.

अनेक नाट्य आयोजकांनी याबाबत नगरपालिकेला कळवूनही या कामात विलंब होत आहे. नाट्यगृहातील स्वच्छतागृहातील दुर्गंधीमुळे डाव्या बाजूकडील खुर्च्यांवर बसून कार्यक्रम बघणे देखील अतिशय कठीण होते. संपूर्ण रत्नागिरीत स्वच्छता कार्यक्रम राबवणारी पालिका किमान कार्यक्रमाच्या वेळी तरी नाट्यगृहातील स्वच्छतागृहातील स्वच्छता का करत नाही ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcultureसांस्कृतिक