शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

रत्नागिरी : कोकण कृषी विद्यापीठात पदवीदान समारंभ, विद्यापीठाचे दूत म्हणून काम करा : डॉ. नरेंद्रसिंह राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 17:32 IST

कृषीसाठी एकत्र मनुष्यबळ निर्मितीचे कार्य देशातील सर्व कृषी विद्यापीठे समाधानकारकपणे करत आहेत. या विद्यापीठांमधून पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे दूत म्हणून शेतकऱ्यांसाठी काम केले पाहिजे. कृषी क्षेत्रामध्ये उद्योजक कसे निर्माण होतील, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (शिक्षण) डॉ. नरेंद्रसिंह राठोड यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देविद्यापीठाचे दूत म्हणून काम करा : डॉ. नरेंद्रसिंह राठोडदापोली कोकण कृषी विद्यापीठात पदवीदान समारंभ,

दापोली : कृषीसाठी एकत्र मनुष्यबळ निर्मितीचे कार्य देशातील सर्व कृषी विद्यापीठे समाधानकारकपणे करत आहेत. या विद्यापीठांमधून पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे दूत म्हणून शेतकऱ्यांसाठी काम केले पाहिजे. कृषी क्षेत्रामध्ये उद्योजक कसे निर्माण होतील, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (शिक्षण) डॉ. नरेंद्रसिंह राठोड यांनी व्यक्त केले.दापोली डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ३७ व्या पदवीदान समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, कृषी पदवीधरांनी शेतकऱ्यांप्रति बांधिलकी आणि समर्पणाची भावना अंगी बाणवणे आवश्यक आहे. यातूनच भारतातील शेती आणि शेतकरी यांचा विकास होईल, असे सांगितले.

पदवीदान समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी आणि फलोत्पादन मंत्री आणि विद्यापीठाचे प्रतिकुलपती पांडुरंग फुंडकर होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य, अधिष्ठाता डॉ. सतीश नारखेडे, अधिष्ठाता डॉ. हुकुमसिंंग ढाकर, अधिष्ठाता डॉ. यशवंत खांदेतोड, कार्यकारी परिषद सदस्य संजय केळकर, संजय कदम, माजी कुलगुरु डॉ. किसन लवांडे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, डॉ. संजय भावे, डॉ. यु. व्ही. महाडकर, डॉ. एम. एम. बुरोंडकर, डॉ. केशव पुजारी, डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.पदव्युत्तर स्नातकांमध्ये सन २०१५-१६ करिता चिन्मयी प्रसाद बाळ (कृषी), छाया राघो कवितकर (कृषी अभियांत्रिकी), सुभाश्री बिजय मोहपात्रा (उद्यानविद्या), सौरभ सुभाष कदम (कृषी जैवतंत्रज्ञान), उबेद कयुम (एम.एफ.एस्सी.), मिलिंद दिगंबर पाटील (वनशास्त्र) यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. पदवी स्नातकांमध्ये सन २०१६-१७ वर्षासाठी श्रद्धा भास्कर सावंत (कृषी), टी. आर. बी. भाग्यलक्ष्मी (उद्यानविद्या), दामिनी व्ही. भारंबे (कृषी अभियांत्रिकी), अभिषेक संजय मुळ्ये, रवी अशोक चव्हाण (अन्न तंत्रज्ञान) अंजली काशिराम बी. आदम (कृषी), विनायक बबनराव पाटील (कृषी जैवतंत्रज्ञान), काजल अशोक पाटील (वनशास्त्र) यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. सन २०१६-१७साठीचे ह्यअस्पीह्ण सुवर्णपदक श्रद्धा भास्कर सावंत (कृषी) आणि दामिनी व्ही. भारंबे (कृषी अभियांत्रिकी) यांना तर याच वर्षासाठीचे ह्यसर रॉबर्ट अ‍ॅलनह्ण सुवर्णपदक श्रद्धा भास्कर सावंत (कृषी) हिला प्रदान करण्यात आले.सन २०१५-१६साठीचे कै. जी. जी. ठाकरे सुवर्णपदक ए. मोहनकुमार (कृषी) तर याच वर्षासाठीचे हेक्झामार सुवर्णपदक निखत अन्वर तळघरकर (कृषी), सानिका संजय जोशी (कृषी), अश्विनी राजेंद्र चव्हाण (कृषी), चिन्मयी प्रसाद बाळ (कृषी) आणि सुभाश्री बिजय मोहपात्रा (कृषी) यांना प्रदान करण्यात आले.

सन २०१६-१७ साठीचे कै. मंदाकिनी सहस्त्रबुद्धे सुवर्णपदक कृष्णजा आर. नायर (कृषी) तर कै. अरुण नायकवाडी सुवर्णपदक श्वेता बसवराज कराडीपाटील (कृषी) विस्तार शिक्षण यांना बहाल करण्यात आले. 

टॅग्स :agricultureशेतीRatnagiriरत्नागिरी