शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

पावसाने फिरवली पाठ, पाणी नियोजनाची अवघड वाट

By शोभना कांबळे | Updated: August 29, 2023 15:47 IST

ऊन-पावसाचा खेळ सुरू

रत्नागिरी : यंदा पावसाने सुरुवातीपासूनच नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविण्यास सुरुवात केली होती. यंदा आगमनच उशिरा झाले. मात्र, जून आणि जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पावसाची पाठच होती. मात्र, जुलै मध्यंतरानंतर पावसाने काही दिवस मुसळधार पडून पहिल्या दोन महिन्यांचा कोटा पूर्ण केला. मात्र, ऑगस्ट संपत आल्याने आता जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांची सरासरी गाठणे अवघड वाटत आहे. पावसाची सध्याची वाटचाल पाहता भविष्यात पाणी नियोजनाची वाट अवघड होणार असल्याचे दिसत आहे.गेल्यावर्षी पावसाने उशिरा सुरुवात केली असली तरी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे वार्षिक सरासरीच्या ७६ टक्के पाऊस ऑगस्ट महिन्यात, तर ८९ टक्के पाऊस सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत नोंदविला गेला होता. यंदा मान्सूनचे आगमनच उशिरा झाले. परंतु जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मुसळधार पडलेल्या पावसाने जून आणि जुलै या दोन महिन्यांची सरासरी ओलांडली. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण एकदमच कमी झाले आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात साधारणत: ८२९ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा ऑगस्ट महिना संपत आला आहे. या महिन्यात केवळ ३७१ मिलिमीटर पाऊस पडला आहे.हवामान खात्याकडून पाऊस कोकणात पुन्हा परतणार असल्याचा अंदाज अधूनमधन व्यक्त होत असला तरी पावसाची हुलकावणी कायम आहे. मात्र, सध्या उन्हाळ्याच्या हंगामासारखे ऊन पडू लागले आहे. उष्माही वाढू लागला आहे. मात्र, पावसाची पाठच आहे. मधूनच श्रावणातील ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. सोमवारी दिवसभरात पावसाच्या सरी जोरदार कोसळल्या. पण या सरीनंतर पुन्हा तेवढेच कडाक्याचे ऊन पडत होते. त्यामुळे पावसाचा लहरीपणा वाढू लागला आहे.

तीन महिन्यांत ७४ टक्केजून ते सप्टेंबर हे चार महिने कोकणात पावसाचे मानले जातात. या चार महिन्यांच्या कालावधीत जून महिन्यात साधारणत: ८१८ मिलिमीटर, जुलै महिन्यात १२८६, ऑगस्ट महिन्यात ८२९ आणि सप्टेंबर महिन्यात ४२९ मिलिमीटर असा एकूण ३३६४ मिलिमीटर पाऊस पडतो. गेल्या तीन महिन्यांत वार्षिक सरासरीच्या ७४ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. त्यामुळे २५ टक्के पाऊस सप्टेंबरपर्यंत पडेल का? अशी शंका वाटत आहे.

गेल्या वर्षीही पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली नव्हती. गेल्या वर्षी २९९१ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे पाणी टंचाई लवकर निर्माण झाली. गेल्या वर्षी ऑगस्टपर्यंत २५६७ इतका पाऊस झाला होता. त्यातुलनेने यंदा पाऊस कमीच आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस