शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या रिकव्हरीपेक्षा रत्नागिरी जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 17:56 IST

corona virus, Hospital, Ratnagirinews वेळेवर निदान, योग्य उपचार आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा वेळेवर शोध घेणे यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण चांगले आहे. नवीन रुग्णांचा कमी होत जाणारा वेग हेही त्याचे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण राज्याच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे.

ठळक मुद्देराज्याच्या रिकव्हरीपेक्षा रत्नागिरी जिल्हा अव्वलवेळेवर निदान, योग्य उपचार आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा वेळेवर शोध

मनोज मुळ्येरत्नागिरी : वेळेवर निदान, योग्य उपचार आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा वेळेवर शोध घेणे यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण चांगले आहे. नवीन रुग्णांचा कमी होत जाणारा वेग हेही त्याचे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण राज्याच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे.राज्याचे रिकव्हरीचे प्रमाण ९२.४९ टक्के असून, रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमाण ९४.३६ टक्के आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मार्च महिन्यात पहिला कोरोना रुग्ण सापडला. मार्चपासून जूनपर्यंत रुग्णवाढीचा वेग खूपच कमी होता.

ज्यावेळी जिल्ह्यांच्या सीमांवरील बंदी उठवण्यात आली, तेव्हा मोठ्या प्रमाणात परजिल्ह्यातील विशेषत: मुंबईतील कोकणवासीय रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले. त्यामुळे जुलै महिन्यापासून हा वेग वाढू लागला.जुलै महिन्यात १,२१२ रुग्ण सापडले होते. मात्र, ऑगस्टमध्ये ही संख्या २,१०६ इतकी झाली. सप्टेंबर महिन्यात तब्बल ३४७६ रुग्ण सापडले. ऑक्टोबर महिन्यापासून ही संख्या कमी झाली.तपासण्या वाढू लागल्यानंतर रत्नागिरीत स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आली. त्यामुळे निदान लवकर होऊ लागले. निदान वेळेवर होत असल्याने रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्याला गती देण्यात आली. त्यावेळी फक्त रत्नागिरी जिल्हा रुग्णालय हेच कोविड रुग्णालय होते. मात्र, जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये रुग्ण सापडत असल्याने कोविड रुग्णालयांची संख्या वाढवण्यात आली.

प्रत्येक तालुक्यात कोविड रुग्णालय झाल्याने उपचारांना गती आली. एका बाजूला जलद उपचार आणि दुसऱ्या बाजूला कमी झालेले रुग्ण यामुळे कोरोना रिकव्हरीचे प्रमाण चांगल्या पद्धतीने वाढू लागले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलRatnagiriरत्नागिरी