शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

रत्नागिरी जिल्ह्यात जलयुक्त शिवारची तिसऱ्या टप्प्यातील कामे रखडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 13:22 IST

राज्यातील प्रत्येक गाव पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले पाहिजे, यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्णत्त्वाच्या मार्गावर असताना तिसऱ्या टप्प्यासाठी अंतिम आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबंधारा बांधकाम निकषाच्या अडथळ्यांमुळे रखडपट्टी होण्याची शक्यतातीव्र उतारामुळे पाणी अडविणे कठीणसमतल जमिनीमुळे बंधाऱ्याचे काम रखडणार

रत्नागिरी : राज्यातील प्रत्येक गाव पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले पाहिजे, यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्णत्त्वाच्या मार्गावर असताना तिसऱ्या टप्प्यासाठी अंतिम आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यासाठी टंचाईग्रस्त गावांचीच निवड करण्यात आली आहे. परंतु, बंधारे बांधकामासाठीचे निकष हे कोकणच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता, राज्यासाठी एकसारखेच तयार केल्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील कामे रखडण्याची शक्यता आहे.तिसऱ्या टप्प्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ४० गावांची निवड करण्यात आली असून, यासाठी १८ कोटी १६ लाख २८ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. १ हजार ४२६ कामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विकास माथा ते पायथा या तत्त्वावर गावांची निवड करून वरच्या भागात ७० टक्के क्षेत्र व खालच्या भागात ३० टक्के विकासाची कामे हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभागाकडे१ हजार २७७ कामांचे उद्दिष्ट असून, १५९१.३० हेक्टर क्षेत्रावरील या कामांसाठी १२ कोटी ९६ लाख ९६ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे ७० कामांचे उद्दिष्ट असून, ४ कोटी ७० लाख ४३ हजार रूपयांचा निधी त्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडे अवघी तीन कामे सुपूर्द करण्यात आली असून, त्यासाठी ३ लाख ४० हजारांचा निधी मंजूर केला आहे. पंचायत समिती कृषी विभागाकडे ७६ कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी ४४ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.रत्नागिरी तालुक्यातील कामांसाठी १ कोटी ४४ लाख ५२ हजारांचा निधी, लांजा तालुक्याकरिता १४३ कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी २ कोटी ६५ लाख २५ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राजापूर तालुक्यातील ९८ कामांसाठी १ कोटी २२ लाख २६ हजारांचा निधी मंजूर केला आहे.

चिपळूण तालुक्याला १९५ कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी २ कोटी ७३ लाख ६८ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. गुहागर तालुक्यामध्ये एकूण ११६ कामे करण्यात येणार असून, त्यासाठी १ कोटी ३० लाख ५० हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. संगमेश्वर तालुक्यासाठी २०२ कामांचे उद्दिष्ट असून, २ कोटी २५ लाख १९ हजार रूपयांची निधी मंजूर झाला आहे.दापोली तालुक्याला एकूण ९९ कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी १ कोटी ३२ लाख ४८ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. खेड तालुक्याकरिता एकूण २७८ कामांचे उद्दिष्ट असून, ४ कोटी १५ लाख २ हजाराचा निधी त्यासाठी मंजूर केला आहे. मंडणगड तालुक्यातील ५५ कामांसाठी १ कोटी ७ लाख ३८ हजार रूपये इतका निधी मंजूर झालाआहे.तीव्र उतारामुळे पाणी अडविणे कठीणजलयुक्त शिवार अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या एका बंधाऱ्यात एक दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होत असेल तर त्यासाठी ८० हजार रूपये खर्च करण्याचा निकष लावण्यात आला आहे. साधारणत: सिमेंट नालाबांध बांधण्यासाठी जर १० ते १५ लाख रूपये खर्च करण्यात आले तर त्यामध्ये दहा दक्षलक्ष घनमीटर पाणीसाठा होणे अपेक्षित आहे. मात्र, कोकणात तीव्र उतार आहे. पाणी उंचावरून पडत असल्याने अशाप्रकारे बंधारा बांधणे शक्य नाही.समतल जमिनीमुळे बंधाऱ्याचे काम रखडणारराज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये समतल जमीन असल्याने अशाप्रकारे बंधारे बांधण्यासाठीचा निकष योग्य आहे. या निकषामुळे जिल्ह्यातील बंधाऱ्यांचे काम रखडणार आहे. सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम न होता केवळ अनगड दगडी बंधारे, जाळी बंधारे शिवाय वृक्षलागवडसारखी छोटी कामे जिल्ह्यात करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीJalyukt Shivarजलयुक्त शिवार