शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
3
बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही
4
Shoaib Malik शी घटस्फोटानंतर Sania Mirza ने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव
5
तब्येत बरी नसतानाही IPL मॅचनंतर शाहरुखची 'ती' कृती जिंकतेय चाहत्यांचं मन; Video व्हायरल
6
Gold-Silver Price: रिटर्न देण्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला टाकलं मागे, पाहा किती झाली किंमत?
7
मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी
8
"मला iPhone घेण्याची ऐपत नाही..."; लेकीनं बापाला इतकं सुनावलं, रस्त्यावरच गुडघे टेकले
9
प्रज्वल रेवण्णांच्या अटकेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पीएम मोदींना पत्र लिहिलं; केली मोठी मागणी
10
षडयंत्र, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे...; बांग्लादेशी खासदाराच्या मृत्यूचं गूढ कायम
11
“केजरीवाल यांनी कठोर कारवाई करुन न्याय द्यावा”; निर्भयाच्या आईचे स्वाती मालिवाल यांना समर्थन
12
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला न विसरता करा पिंपळाची पूजा; जाणून घ्या कारण!
13
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
14
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
15
Success Story: वडील शेतकरी, आई चालवायची अंगणवाडी केंद्र; मुलानं उभं केलं ₹९७३ कोटींचं साम्राज्य
16
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
17
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या विचारातून परिस्थितीचा सामना करायला शिका!
18
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
19
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
20
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य

रत्नागिरी जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 2:40 PM

रत्नागिरी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, रत्नागिरीचा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन रमेश पवार (४०) याला २५ हजारांची लाच स्वीकारताना रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्याला लाच घेताना अटक जागृती फाऊंडेशन या संस्थेकडे वर्षासाठी ६० हजार रूपये रकमेची मागणी

रत्नागिरी : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, रत्नागिरीचा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन रमेश पवार (४०) याला २५ हजारांची लाच स्वीकारताना रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. कणकवली येथील तक्रारदार हेमंत धुरी हे राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जागृती फाऊंडेशन ही एनजीओ गेल्या १० वर्षांपासून चालवत आहेत. या संस्थेला शासकीय अनुदान मिळते. त्यांच्या कामावर देखरेख ठेवणे, ही जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापकांची जबाबदारी आहे.

मात्र, तक्रारदार हेमंत धुरी यांच्या संस्थेच्या कामकाजात पवार याने वारंवार चुका काढल्या. प्रकल्प बंद करतो, असे सांगून त्यांच्याकडे दरमहा ५ हजार रुपये याप्रमाणे एका वर्षासाठी ६० हजार रूपये एवढ्या रकमेची मागणी केली.तक्रारदार संस्थेने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्याकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार या विभागाने तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली. सापळा कारवाईच्या वेळी सचिन पवार याने ६० हजार रूपये लाचेच्या रकमेपैकी २५ हजार रुपये पहिला हप्ता म्हणून स्वीकारल्यानंतर विभागाच्या पथकाने त्याला पंचांसमक्ष रंगेहात पकडले. त्याच्याकडील २५ हजार रुपयेही हस्तगत केले.

कणकवली (सिंधुदुर्ग) येथे मुख्य कार्यालय असलेल्या जागृती फाऊंडेशन या संस्थेचे हेमंत धुरी हे अध्यक्ष आहेत. चाईल्ड लाईनसाठी तसेच वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचे एचआयव्हीपासून रक्षण होण्याकरिता ही संस्था गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलRatnagiriरत्नागिरी