शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘कोमसाप’चे सप्टेंबरमध्ये जिल्हा साहित्य संमेलन, रत्नागिरी जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर

By अरुण आडिवरेकर | Updated: July 24, 2023 15:54 IST

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे येत्या सप्टेंबरमध्ये रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ...

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे येत्या सप्टेंबरमध्ये रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, कोमसापच्या रत्नागिरी जिल्ह्याची नवीन कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली आहे.कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा मंडळाची कार्यकारिणी सभा जिल्हाध्यक्ष प्रा. आनंद शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोमसापचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर, विश्वस्त अरुण नेरुरकर, केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, गजानन तथा आबा पाटील, कार्यवाह माधव अंकलगे, कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्तीचे जिल्हाध्यक्ष अरुण मोर्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी झालेल्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला जिल्ह्यातील शाखांचे अध्यक्ष, जिल्हा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर म्हणाल्या की, नव्या कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात कोमसापचे कार्य कसे वाढेल यादृष्टीने प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता आहे. वर्षभरात विविध कार्यक्रमांचे नियोजन करून जिल्ह्यातील साहित्यिकांना कोमसापच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. नूतन अध्यक्ष आनंद शेलार यांनी जिल्ह्यात कोमसापचे संघटन मजबूत करण्याचे काम यापुढील काळात करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.विश्वस्त प्रमुख रमेश कीर आणि अरुण नेरुरकर यांनीही मार्गदर्शन करताना कोमसापने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात साहित्य चळवळ प्रवाहित ठेवण्यासाठी कार्य केले आहे. भविष्यात कोमसापच्या कार्यकर्त्यांनी नकारात्मक बाबीकडे दुर्लक्ष करून सकारात्मक विचाराने प्रेरित होऊन कार्य करताना युवा पिढीला प्राधान्य दिले पाहिजे, असे सांगितले.या सभेला लांजा शाखाध्यक्ष रामचंद्र जाधव, राजेश गोसावी, गुहागर शाखाध्यक्ष शाहिद खेरडकर, गुहागर शाखेचे प्रा. बाळासाहेब लबडे, राजापूरचे विनोद मिरगुले, खेडचे गोविंद राठोड, मालगुंड शाखेच्या अध्यक्षा नलिनी खेर, मालगुंड शाखेचे प्रतिनिधी गजानन पाटील, रत्नागिरी शाखेचे सचिव सुनील चव्हाण, खेड शाखेचे जलील राजपूरकर उपस्थित होते. राजापूर शाखाध्यक्ष वासुदेव तुळसणकर आणि रत्नागिरी शाखा अध्यक्षा तेजा मुळ्ये यांनी सभेतील निर्णयांना पाठिंबा असल्याचे लेखी पत्राद्वारे कळविले होते. केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे यांनी आभार मानले.

नूतन कार्यकारिणीउपाध्यक्ष - गोविंद राठोड, वासुदेव तुळसणकर, सचिव - राजेश गोसावी, सहसचिव - विनोद मिरगुले, खजिनदार- शाहिद खेरडकर, केंद्रीय प्रतिनिधी- बाळासाहेब लबडे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकण