शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्हा जातपडताळणी समिती राज्यात द्वितीय, बार्टी, पुणेतर्फे गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 18:03 IST

रत्नागिरी येथील जिल्हा जातपडताळणी समितीला शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेतर्फे गौरविण्यात आले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हा जातपडताळणी समिती राज्यात द्वितीयबार्टी, पुणेतर्फे गौरव

रत्नागिरी : येथील जिल्हा जातपडताळणी समितीला शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेतर्फे गौरविण्यात आले आहे.आयुक्त दिलीप हळदे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील समितीने गेल्या तीन वर्षांपासून आपल्या कार्यक्षमतेचा ठसा स्वतंत्र उमटवला आहे. या विभागात अपुरी पदसंख्या असूनही विविध प्रवर्गातील विद्यार्थी तसेच नागरिक यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्रांचा निपटारा करण्याकडे या कार्यालयाचा कल असतो.पडताळणीच्या कामाचा आवाका लक्षात घेऊन नोव्हेंबर २०१६मध्ये राज्यात ३६ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यासाठी अजूनही पदभरती न झाल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. असे असतानाही आयुक्त हळदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त प्रमोद जाधव यांनी पडताळणीचे काम वेगाने होण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवले आहेत.

रत्नागिरीतील जातपडताळणी कार्यालयातील वरिष्ठ लिपीक, स्टेनो, शिपाई, संशोधन अधिकारी, पोलीस शिपाई ही पदे रिक्त असल्याने या कार्यालयाचे उपायुक्त आणि कनिष्ठ लिपीक यांच्यावरच मदार आहे. आयुक्त दिलीप हळदे यांच्याकडेही रत्नागिरीसह कोकणातील अन्य जिल्ह्यांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

या कार्यालयाच्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने या समितीला राज्यात द्वितीय क्रमांक देऊन गौरव केला आहे. बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी दिलीप हळदे यांचा गौरव केला. 

महाविद्यालयांनी जागा द्यावीबारावी शास्त्र शाखेत शिकणाऱ्या मुलांना जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळावे, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून येथील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या सहकार्याने दरवर्षी शिबिर आयोजित केले जाते. त्यात या मुलांकडून सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दाखल करून घेतले जातात. जिल्ह्यातील अन्य महाविद्यालयांनी जागा उपलब्ध करून दिल्यास जातपडताळणी समिती या महाविद्यालयांमध्येही शिबिर घेईल.प्रमोद जाधव,उपआयुक्त, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorतहसीलदार