शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक योजनांमुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेला तोटाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 13:23 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील आठ प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांच्या पाणीपट्टीच्या वसुलीपेक्षा खर्च जास्त असल्याने दरवर्षी जिल्हा परिषदेला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे़ तरीही लोकांचे पाण्यावाचून हाल होऊ नयेत, यासाठी ना नफा, ना तोटा या तत्त्वावर या योजना चालविण्यात येत आहेत़.

ठळक मुद्देप्रादेशिक योजनांमुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेला तोटाचना नफा, ना तोटा तत्त्वावर योजना

रत्नागिरी : जिल्ह्यातील आठ प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांच्या पाणीपट्टीच्या वसुलीपेक्षा खर्च जास्त असल्याने दरवर्षी जिल्हा परिषदेला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे़ तरीही लोकांचे पाण्यावाचून हाल होऊ नयेत, यासाठी ना नफा, ना तोटा या तत्त्वावर या योजना चालविण्यात येत आहेत़.जिल्ह्यातील आठ प्रादेशिक योजनांमधून अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो़ या योजनांची देखभाल व दुरुस्ती जिल्हा परिषदेकडून करण्यात येते़ मागील अनेक वर्षांपासून या पाणी योजनांच्या माध्यमातून लाखो लोकांची तहान भागवली जात आहे़ तरीही काही योजनांची पाणीपट्टी वेळेवर भरली जात नसल्याने या योजनांची देखभाल दुरुस्ती करताना अडचणीचे ठरत आहे़.सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये देखभाल व दुरुस्तीच्या आराखड्याबाबत या योजनांसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती़ या संपर्क अधिकाऱ्यांनी पाहणी करुन जिल्हा परिषद प्रशासनाला अहवाल सादर केला होता़, त्यानंतर या योजनांच्या एकूण स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी त्या-त्या सरपंचांना निमंत्रित करण्यात आले होते़ त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत थकीत पाणीपट्टीबाबत पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता़. दरम्यान, पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये आरडाओरड सुरु झाली होती़ काही ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा बंद करताच थकीत पाणीपट्टी भरणा केली़ या आठही योजनांची सन २०१७-१८मध्ये ४ कोटी ११ लाख ३८ हजार रुपये पाणीपट्टीची मागणी असतानाही केवळ ८५ लाख रुपये वसुली झाली होती़.

या योजनांवर देखभाल दुरुस्ती, वीज देयकांसह एकूण २ कोटी ५४ लाख रुपये खर्च झाला होता़ त्यामुळे जिल्हा परिषदेला ही योजना चालविताना सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात १ कोटी ६९ लाख १८ हजार रुपये नुकसान सोसावे लागले होते़, त्यावर उपाययोजना म्हणूनच थकीत ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला होता़,

मात्र, पाणी बंद केल्याने ग्रामपंचायतींनी थकीत पाणीपट्टी भरण्याकडे विशेष लक्ष देऊन रक्कमेचा भरणा केला होता़, त्यामुळे चालू आर्थिक वर्षामध्ये या योजनांकडून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या किती ग्रामपंचायतींची पाणीपट्टी थकीत राहिली आहे, हे आठवडाभरानंतर पुढे येणार आहे़. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी