शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांनी केली थिबा राजवाड्याची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 16:28 IST

रत्नागिरीचे भूषण असलेल्या थिबा राजवाड्याच्या दुरूस्तीचे तसेच सुशोभिकरणाचे काम कित्येक वर्षे रखडले असल्याने पर्यटकांना ही वास्तू पाहता येत नाही. याबाबतचे वृत्त मंगळवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी त्याची तातडीने दखल घेत मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने बुधवारी राजवाड्याची पाहणी केली व तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी केली थिबा राजवाड्याची पाहणीलोकमतच्या वृत्ताची तातडीने दखल

रत्नागिरी : रत्नागिरीचे भूषण असलेल्या थिबा राजवाड्याच्या दुरूस्तीचे तसेच सुशोभिकरणाचे काम कित्येक वर्षे रखडले असल्याने पर्यटकांना ही वास्तू पाहता येत नाही. याबाबतचे वृत्त मंगळवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी त्याची तातडीने दखल घेत मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने बुधवारी राजवाड्याची पाहणी केली व तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.ब्रह्मदेशचा राजा थिबा याचे वास्तव्य असलेल्या या ऐतिहासिक वास्तुला देशातील तसेच परदेशातील हजारो पर्यटक दरवर्षी भेट देतात. या राजवाड्यात काही वर्षांपूर्वी शासकीय तंत्रनिकेतन सुरू होते. त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र कार्यालय सुरू होते. त्यामुळे या राजवाड्याची पडझड झाली आहे. सध्या हा राजवाडा पुरातत्व विभागाकडे आहे. यात थिबाकालीन वस्तूंचे संग्रहालयही आहे. मात्र, दुरूस्ती सुरू असल्याने येणाऱ्या पर्यटकांना केवळ संग्रहालयच पाहता येते. राजवाडा पाहता येत नाही. गेल्या चार वर्षात दुरूस्तीचे काम कासवगतीनेच होत आहे.डिसेंबर २०१६मध्ये म्यानमारचे (पूर्वीचे ब्रह्मदेश) उपराष्ट्रपती यु मॅण्ट स्यु व मुख्य लष्कर प्रमुख मीन हाँग अलार्इंग, म्यानमारचा भिक्खु संघ आणि थिबा राजाचे वंशज यांनी थिबा राज्याचे वास्तव्य असलेल्या या राजवाड्याची, बुद्ध विहार, तसेच थिबा राजा आणि त्याची राणी यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. यावेळी या वारसांनी थिबा राजवाड्याच्या सुशोभिकरणासाठी खर्च करण्याची तयारीही दर्शविली होती. मात्र, त्याचवेळी शासनाकडून मिळालेल्या निधीतून दुरूस्ती सुरू होती.राजवाड्याच्या दुरूस्तीच्या कामाला चार वर्षे उलटून गेली आहेत. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या कामाची पाहाणी केली. या राजवाड्यातील प्रत्येक खोलीत जाऊन त्यांनी माहिती घेतली.संबंधित विभागाची कानउघडणीथिबा राजवाड्याच्या दुरूस्तीसाठी आधीचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या कार्यकालात जिल्हा नियोजनमधून ४८ लाख रूपयांचा निधी देण्यात आला होता. त्यातून काम झाल्याचे संबंधित विभागाकडून दाखविण्यात आले होते. मात्र, प्रदीप पी. यांनी त्यावेळी पाहणी केली असता अतिशय निकृष्ट काम केल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी संबंधित विभागाची चांगलीच कानउघाडणी केली होती.

टॅग्स :Thiba Palaceथिबा पॅलेसcollectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी