शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

रत्नागिरी जिल्हा भाजपत येणार बदलाचे चक्रीवादळ ?, बाळ मानेंबाबत वाढती नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 14:51 IST

केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपला गेली काही वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात वारंवार पराभव पत्करावा लागला आहे. चिपळूण नगर परिषद आणि देवरूख नगर पंचायतीमधील यशाखेरीज अन्य निवडणुकांमध्ये भाजप अपयशी झाल्याने आता भाजपमध्ये जिल्हा नेतृत्त्व बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हा भाजपत येणार बदलाचे चक्रीवादळ ?, बाळ मानेंबाबत वाढती नाराजीआगामी निवडणुकांपूर्वी होणार मोठ्या घडामोडी

मनोज मुळ्येरत्नागिरी : केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपला गेली काही वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात वारंवार पराभव पत्करावा लागला आहे. चिपळूण नगर परिषद आणि देवरूख नगर पंचायतीमधील यशाखेरीज अन्य निवडणुकांमध्ये भाजप अपयशी झाल्याने आता भाजपमध्ये जिल्हा नेतृत्त्व बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अलिकडच्या काळात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रसाद लाड यांचे प्रस्थ वाढू लागले आहे.गेली अनेक वर्षे बाळ माने म्हणजेच रत्नागिरी जिल्हा भाजप असेच समीकरण झाले आहे. एकतर तेच अनेक वर्षे जिल्हाध्यक्ष आहेत आणि मधल्या काळात झालेले अन्य जिल्हाध्यक्ष हे त्यांनीच पुढे आणलेले त्यांचे जवळचे सहकारी होते. पडत्या काळातही बाळ माने यांनी भाजपची धुरा सोडली नव्हती.केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर मात्र जिल्हा भाजपमध्ये वाढ अपेक्षित धरली जात होती. मात्र, नगर परिषद, नगरपंचायतीत भाजपला माफक यश मिळाले. चिपळूण आणि देवरूख या दोन ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. त्यात देवरूखमध्ये राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीच विशेष पुढाकार घेतला होता. ही दोन ठिकाणे वगळता भाजपला मोठे यश मिळालेले नाही.जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्येही भाजपला खूप मोठा पराभव पत्करावा लागला. जिल्हा परिषदेत एकही जागा न मिळालेल्या भाजपला पंचायत समितीमध्येही फारसे काही हाती लागले नाही. जिल्ह्यातील भाजपच्या या एकूणच पराभवांचा पक्षीय पातळीवर गांभीर्याने विचार केला जात आहे. त्यामुळेच अलिकडे रत्नागिरी जिल्ह्यात संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रसाद लाड यांचे दौरे वाढले आहेत.

महत्त्वाच्या निर्णयांमधील या दोन नेत्यांचा सहभाग वाढला आहे. ह्यपदवीधरह्ण निवडणुकीसाठी डावखरे यांच्या प्रचाराची मुख्य सुत्रे प्रसाद लाड यांच्याकडे होती आणि प्रचारप्रमुख म्हणून अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्यावर जबाबदारी होती. या दोघांनीही जिल्ह्यातील सर्व लोकांना सोबत घेतल्याचा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरला आहे. या निवडणुकीत बाळ माने बाजूलाच राहिले होते.

रत्नागिरीसाठी प्रसाद लाड?भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात प्रसाद लाड हे नाव अधिक प्रकर्षाने पुढे येत आहे. रत्नागिरी जिल्ह्याकडे त्यांनी विशेष लक्ष देण्यास सुरूवात केली असून, रत्नागिरी विधानसभा मतदार संघात २०१९मध्ये त्यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी रत्नागिरी मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून, या मतदार संघातील त्यांचे दौरेही अलिकडे वाढले आहेत. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनीच प्रमुख सुत्रे सांभाळली आहेत.

बाळ माने चिपळूणमधून लढणार?अलिकडे भाजपसाठी चिपळूण हे महत्त्वाचे ठिकाण होऊ लागले आहे. आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा वर्धापन दिन बाळ माने यांनी चिपळूणमध्येच साजरा केला होता. चिपळूण नगर परिषदेवर भाजपचा नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर बाळ माने यांनी चिपळूण तालुक्याकडे अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे २०१९मध्ये ते विधानसभा निवडणूक चिपळूण मतदार संघातून लढणार की काय, अशी चर्चा पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.जानेवारीत राजीनामा दिला होता?जानेवारी महिन्यात राजेश सावंत यांना शिवसेनेतून भाजपमध्ये घेण्यात आले, तेव्हा प्रवेशाच्या दिवशीच त्यांच्याकडे रत्नागिरी, राजापूर, लांजा आणि संगमेश्वर या चार तालुक्यांचा जिल्हाध्यक्ष अशी जबाबदारी देण्यात येणार होती. मात्र, ही बाब समजल्यानंतर बाळ माने यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली.

इतकेच नाही तर मुंबईत असूनही प्रवेशाला उपस्थित न राहण्याची भूमिका घेतली. सकाळी ११ वाजता होणारा प्रवेशाचा कार्यक्रम सायंकाळवर ढकलावा लागला. अखेर हा बदल तूर्त टाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राजीनाम्याची बाब कोठेही बाहेर आली नाही. मात्र, कार्यकर्त्यांमधील नाराजी वाढत असून, येत्या काही काळात हे बदल केले जाणार असल्याची चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये होत आहे. 

टॅग्स :BJPभाजपाRatnagiriरत्नागिरी