शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : चिपळुणात दशावतारी नाट्य महोत्सव, रक्षक झाला राक्षसमध्ये परमेश्वर अस्तित्वाची महती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 20:58 IST

चिपळूण येथे सुरू असलेल्या दशावतारी नाट्य महोत्सवात तिसऱ्या दिवशी श्री वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ, तेंडोली यांच्या रक्षक झाला राक्षस या दशावतारी नाट्यप्रयोगाने धमाल उडवून दिली. मातृ देवो भव:, पितृ देवो भव:, आचार्य देवो भव: याची महती सांगत सामान्य जीवनात कसे जगावे, याचे महत्त्व पटवून देतानाच आईची महती अधिक ठळकपणे या प्रयोगात मांडण्यात आली.

ठळक मुद्देवैद्यबुवा व त्यांच्या पत्नीच्या कॉमेडीने उडाले हास्याचे फवारेमहोत्सवाला चिपळूणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण : चिपळूण येथे सुरू असलेल्या दशावतारी नाट्य महोत्सवात तिसऱ्या दिवशी श्री वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ, तेंडोली यांच्या रक्षक झाला राक्षस या दशावतारी नाट्यप्रयोगाने धमाल उडवून दिली. मातृ देवो भव:, पितृ देवो भव:, आचार्य देवो भव: याची महती सांगत सामान्य जीवनात कसे जगावे, याचे महत्त्व पटवून देतानाच आईची महती अधिक ठळकपणे या प्रयोगात मांडण्यात आली.वैद्यबुवा व त्यांच्या पत्नीच्या कॉमेडीने हास्याचे कारंजे फुलले. नाट्यप्रयोगातील हा भाग मनाला ताजेतवाने करुन गेला. त्यामुळे नाट्यप्रयोगाची उंची अधिक वाढली. वैद्यबुवांचा अभिनय करणारे मंगेश साटम व त्यांच्या पत्नीची भूमिका साकारणारे विनायक सर्वेकर हे भाव खाऊन गेले. सर्वेकर यांचा ब्राह्मणही तितकाच उठावदार होता. तर त्यांची ब्राह्मण पत्नी म्हणून नारायण कुंभार यांनी रंगत आणली. योगेश कोंडुसकर यांचा नारद अधिक प्रभावी वाटला.सृष्टीच्या चराचरात परमेश्वराचा वास आहे, त्याचे अस्तित्व सर्वांच्यात आहे, परमेश्वर सर्वांच्या अंतरंगी सामावलेला आहे. त्यामुळे आपण सर्व एक आहोत, असा संदेश या नाट्यप्रयोगातून देण्यात आला. राजा मित्रसह त्यांची भूमिका करणारे विघ्नराजेंद्र कोंडुसकर यांची प्रभावी शब्दफेक, शुध्द उच्चार व न डगमगता केलेले स्वगत अधिक लक्षवेधी होते. त्यांची राणी दमयंती यांची बबली धुरी यांनी साकारलेली भूमिकाही यथायोग्य होती.

अमित परब व नारायण प्रभू यांचा नरराक्षस संपूर्ण प्रयोगावर छाप पाडून गेला. आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी आसुसलेला नरराक्षस नाना प्रभू यांनी ताकदीने रंगवला. वशिष्टमुनींची भूमिका मेघश्याम सर्वेकर, आचारी सुमंत थोरबोले, गणपती प्रसाद भाईप व रिध्दीसिध्दी दिनेश मांजरेकर यांनी चांगली साथ दिली. हार्मोनियम साथ पराग प्रभू, मृदुंगमणी प्रकाश राऊळ, महादेव चव्हाण, चंद्रकांत परब, संदीप गावडे यांनी उत्तम सहकार्य केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcultureसांस्कृतिक