शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

रत्नागिरी : दापोली उपजिल्हा रूग्णालयाची दोरी प्रभारींच्या हाती, रिक्त पदे भरण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 17:49 IST

दापोली उपजिल्हा रूग्णालयात आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असली तरी आॅक्टोबर २०१६पासून या रूग्णालयाचा कारभार प्रभारींच्याच हाती आहे. मात्र, तरीही आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेताना येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रूग्णालयाचा दर्जा मात्र अजिबात घसरू दिलेला नाही.

ठळक मुद्दे उपजिल्हा रूग्णालयातील मंजूर ४६ पदांपैकी ३४ पदे भरली वैद्यकीय अधीक्षकांसह १२ पदे रिक्त प्रभारींच्या कार्यकाळात रूग्णालयाचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी प्रयत्न

दापोली : दापोली उपजिल्हा रूग्णालयात आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असली तरी आॅक्टोबर २०१६पासून या रूग्णालयाचा कारभार प्रभारींच्याच हाती आहे. मात्र, तरीही आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेताना येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रूग्णालयाचा दर्जा मात्र अजिबात घसरू दिलेला नाही.

या रूग्णालयाला वैद्यकीय अधीक्षक पदासह इतर कर्मचाऱ्यांसाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, असा प्रश्न सर्वसामान्य रुग्ण व दापोलीवासियांकडून विचारला जात आहे.दापोली उपजिल्हा रूग्णालयासाठी मंजूर एकूण ४६ पदांपैकी ३४ पदे सध्या भरण्यात आली असून, वैद्यकीय अधीक्षक वर्ग १ या मुख्य पदासह तब्बल १२ पदे आजही रिक्तच आहेत. त्यामुळे वर्ग २ चे वैद्यकीय अधिकारी हे प्रभारी म्हणून गेली पावणेदोन वर्षे उपजिल्हा रूग्णालयाचे काम पाहत आहेत.

या पावणेदोन वर्षात येथे कार्यरत प्रभारींनी उत्तम काम करून शासनाकडून देण्यात येणारा डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळवून दापोली उपजिल्हा रूग्णालयाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे.

दापोली उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जरी चांगले काम केले असले, तरी दररोज बाह्यरुग्ण विभागात होणारी रूग्णांची गर्दी पाहता याठिकाणी कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यावर कामाचा ताण पडत असून, त्यांच्याही मानसिकतेचाही विचार करणे गरजेचे आहे.

दापोली उपजिल्हा रूग्णालयात कायमच रूग्णांची गर्दी असते. याठिकाणी अपुरे कर्मचारी असल्याने काहीवेळा सेवेतील त्रुटींमुळे रूग्णांसह त्यांच्याबरोबर आलेल्या नातेवाईकांचे येथील वैद्यकीय अधिकारी वा कर्मचाऱ्यांशी या ना त्या कारणाने खटके उडताना पाहायला मिळतात. मात्र, यावेळी रूग्णालयातील अधिकारी वा कर्मचारी हे कायमच संयमी भूमिका बजावताना दिसतात.दापोली उपजिल्हा रूग्णालयातील कामकाजाच्या वार्षिक आकडेवारीकडे पाहता, या रूग्णालयात कायम रुग्णांची गर्दी असल्याचे दिसून येईल. या रुग्णालयातील रिक्त पदे का भरली जात नाहीत? असा प्रश्न रुग्णांकडून विचारला जात आहे.

उपजिल्हा रूग्णालयात दापोलीसह मंडणगड, खेड आणि काही प्रमाणात गुहागर तालुक्यातील रूग्ण आरोग्य तपासणी व उपचार घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे येथे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडतो. त्यामुळे या रुग्णालयातील रिक्त पदे त्वरित भरून रूग्णालय अधिक सक्षम करावे, अशी मागणी होत आहे.रूग्णांना सेवा देताना तारेवरची कसरतदापोली उपजिल्हा रुग्णालयात सन २०१५-१६मध्ये ८० हजार २४६ रूग्णांनी तपासणी करून घेतली. त्यामधील ६ हजार ८९० रूग्णांना अधिक उपचारासाठी रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले. तसेच १ हजार २६ महिलांच्या प्रसुती करण्यात आल्या. त्यामध्ये ३१५ सिझर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

याव्यतिरिक्त श्वानदंश ४७२, सर्पदंश ३४५, विंचूदंश २३५ तर सन २०१६-१७मध्ये बाह्यरुग्ण ५९ हजार १८१, आयपीडी ६ हजार १२०, श्वानदंश ११९८, सपदंश २७३, विंचूदंश २४९, प्रसुती ९७६, सिझर २९६, शवविच्छेदन ६६, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ४८१ त्याचप्रमाणे सन २०१७-१८मध्ये बाह्यरुग्ण १० हजार ५०५, आयपीडी ५ हजार ७६९, विंचूदंश २८६, श्वानदंश ९९१, सर्पदंश २९८, प्रसुती ६४३ सिझर १८६, शवविच्छेदन ५१, कुटुंब नियोजनाच्या ३९८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.अ३३ंूँेील्ल३२

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHealthआरोग्य