शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी :दादर-रत्नागिरी-मडगाव ही एकच रेल्वे पॅसेंजर, विभागीय व्यवस्थापकांचा खुलाशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 15:47 IST

रत्नागिरी - दादर - रत्नागिरी ही पॅसेंजर रेल्वे गेल्या तीन वर्षांपूर्वीच मडगावपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. त्यामुळे ही गाडी आता दादर - रत्नागिरी - मडगाव अशीच सुरू आहे.

ठळक मुद्देगाडी स्वतंत्र नसल्याचे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापकांच्या खुलाशानंतर स्पष्टमडगावहून रत्नागिरीत येताना व रत्नागिरीतून दादरला जाताना गाड्यांचे नंबर बदलतात

रत्नागिरी : रत्नागिरी - दादर - रत्नागिरी ही पॅसेंजर रेल्वे गेल्या तीन वर्षांपूर्वीच मडगावपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. त्यामुळे ही गाडी आता दादर - रत्नागिरी - मडगाव अशीच सुरू आहे. मात्र, मडगावहून रत्नागिरीत येताना व रत्नागिरीतून दादरला जाताना या गाड्यांचे नंबर बदलले जातात, अशी माहिती कोकण रेल्वेचे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी-दादर - रत्नागिरी अशी रत्नागिरी स्थानकातून स्वतंत्र पॅसेंजर गाडी सोडली जात होती. त्यामुळे रत्नागिरी पॅसेंजरची स्वतंत्र फेरी रद्द होऊन ती दादर-मडगाव झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, त्याबाबत कोकण रेल्वेकडे विचारणा केली असता रत्नागिरी-दादर स्वतंत्र गाडी आहे व रत्नागिरी-मडगाव वेगळी फेरी आहे, असा युक्तिवाद सातत्याने केला जात होता. मात्र, आता ही गाडी स्वतंत्र नाही, हे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापकांच्या खुलाशानंतर स्पष्ट झाले आहे.सध्याच्या पावसाळ्यात कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षितता मिळावी, गणेशोत्सवातील जादा गाड्यांचे नियोजन योग्यरित्या व्हावे व मुंबईकरांचा कोकण दौरा सुखकर, सुरक्षित व्हावा, यासाठी मार्गावर सर्वत्र दिवस-रात्र कर्मचाऱ्यांनी नजर ठेवली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांच्या गणेशोत्सवाकडे लक्ष न देता युद्धपातळीवर मार्ग सुरक्षिततेचे काम केले आहे. त्यामुळेच पावसाळ्यात व गणेशोत्सव काळात कोकण रेल्वेकडून प्रवाशांना चांगली सेवा पुरविणे शक्य झाल्याचे शेंड्ये म्हणाले.मार्ग सुरक्षेवर ८०० कोटी खर्चगेल्या दहा वर्र्षांपासून कोकण रेल्वे सातत्याने फायद्यात आहे. यंदाही कोकण रेल्वेचा फायदा दीडशे कोटींच्या जवळपास आहे. मात्र, दरवर्षी होणाऱ्या फायद्यातील ९० टक्के रक्कम कोकण रेल्वे मार्गाच्या सुरक्षिततेवर खर्च केली जात आहे. गेल्या १० वर्षांच्या काळात कोकण रेल्वेमार्गावरील दरडी कोसळण्याचे प्रमाण संपुष्टात आले आहे. दरडी कोसळू नयेत, यासाठीच्या उपाययोजनांवर आतापर्यंत सुमारे ८०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे शेंड्ये म्हणाले.गुटख्याच्या पिचकाऱ्यास्वच्छता सप्ताहच्या पार्श्वभूमीवर माहिती देताना कोकण रेल्वेचे काही कर्मचारी गुटखा खाऊन त्याच्या पिचकाऱ्या स्थानकांमध्ये, कार्यालयाच्या आवारात मारीत असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत नक्की दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे शेंड्ये म्हणाले.स्वच्छता पंधरवडा१७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत रेल्वेमार्ग, रेल्वे गाड्या तसेच रेल्वे स्थानके यांची स्वच्छता केली जाणार आहे. रेल्वे स्थानके व रेल्वेमध्ये स्वच्छता राखणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. त्याबाबतही प्रबोधन केले जाणार आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी