शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : सांस्कृतिकमंत्र्यांनी नांदीची फर्माईश करताच उमटले नमन नटवराचे सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 17:38 IST

ते राज्याचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहेतच, शिवाय नुकतेच त्यांनी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपदही स्वीकारले आहे. एका आॅर्गनच्या (हार्मोनियम) वर्कशॉपला त्यांनी भेट दिली आणि चक्क नांदी ऐकवण्याची फर्माईश केली. सादर झालेले नमन नटवरा... मनापासून ऐकून तेही खूश झाले. हा किस्सा आहे राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील. सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांची ही फर्माईश पूर्ण केली आॅर्गननिर्माते बाळ दाते यांनी.

ठळक मुद्दे- बाळ दाते यांचे कौतुक, आडिवरे येथील आॅर्गन वर्कशॉपला भेट विनोद तावडे यांनीही धरला ठेका

अरुण आडिवरेकररत्नागिरी : ते राज्याचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहेतच, शिवाय नुकतेच त्यांनी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपदही स्वीकारले आहे. एका आॅर्गनच्या (हार्मोनियम) वर्कशॉपला त्यांनी भेट दिली आणि चक्क नांदी ऐकवण्याची फर्माईश केली. सादर झालेले नमन नटवरा... मनापासून ऐकून तेही खूश झाले. हा किस्सा आहे राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील. सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांची ही फर्माईश पूर्ण केली आॅर्गननिर्माते बाळ दाते यांनी.आडिवरे (ता. राजापूर) येथे उभारण्यात आलेल्या तावडे अतिथी भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे आले होते. तावडे अतिथी भवनचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी आडिवरे येथील बाळ दाते यांच्या आॅर्गनच्या वर्कशॉपला भेट दिली.

या भेटीत अनेक वर्षांचे असलेले नाट्यसंगीत आणि आॅर्गन यांचे नाते जाणून घेत दाते यांच्याकडून आॅर्गन तयार करण्याबाबतची तपशिलवार माहिती जाणून घेतली. या भेटीदरम्याने विनोद तावडे यांनी सांगितले की, अमेरिकेत जे आॅर्गन बंद पडले ते भारतात आणि विशेषकरून कोकणात तयार होत आहे. हे आॅर्गन अमेरिकेतील लोक येथून घेऊन जात आहेत, ही अभिमानाची बाब आहे. विशेषत: आॅर्गन आणि पेटी यात फरक आहे. आॅर्गनमध्ये एक वेगळीच गोडी आहे, असे सांगितले.आॅर्गनबाबतचे बारकावे जाणून घेत असतानाच ते म्हणाले, ह्यह्य कालच ९८व्या नाट्यसंमेलनाचा स्वागताध्यक्ष झालो आहे. अध्यक्ष म्हणून कीर्ती शिलेदार या आहेत. त्या नाट्य संगीतातील एक चांगल्या जाणकार आहेत. त्यामुळे आपल्याला नांदी ऐकायला आवडेल,  असे त्यांनी सांगितले. सांस्कृतिक मंत्र्यांनी नांदीची फर्माईश करताच बाळ दाते यांची बोटे आॅर्गनवर फिरू लागली. नमन नटवरा या नांदीचे सूर ऐकून खूश झालेल्या विनोद तावडे यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.आॅर्गन संशोधनासाठी सर्वतोपरी मदतआॅर्गनमध्ये बाळ दाते भरपूर संशोधन करावे. मुंबईतील आयआयटी असेल किंवा अन्य कोणतीही मदत असेल ती शासन म्हणून आपण निश्चितच करू. आॅर्गन संशोधनासाठी शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन तावडे यांनी दिले. 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेRatnagiriरत्नागिरीcultureसांस्कृतिक