शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : फासकीतून पळालेल्या बिबट्याचा करूण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 11:41 IST

चिपळूण तालुक्यातील गाणेखडपोली येथे फासकीत अडकलेल्या आणि त्यानंतर फासकीतून स्वत:ची सुटका करून पाच ग्रामस्थांना जखमी करून पळून गेलेल्या बिबट्याचा अखेर करूण अंत झाला आहे. या बिबट्याचा मृतदेह रविवारी सायंकाळी उशिरा गाणे गावातील नदीकिनारी एका झुडूपात आढळून आला.

ठळक मुद्देफासकीतून पळालेल्या बिबट्याचा करूण अंतशवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्यूचे कारण उलगडणार

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील गाणेखडपोली येथे फासकीत अडकलेल्या आणि त्यानंतर फासकीतून स्वत:ची सुटका करून पाच ग्रामस्थांना जखमी करून पळून गेलेल्या बिबट्याचा अखेर करूण अंत झाला आहे. या बिबट्याचा मृतदेह रविवारी सायंकाळी उशिरा गाणे गावातील नदीकिनारी एका झुडूपात आढळून आला.खडपोली येथील एमआयडीसीमधील साफयीस्ट कंपनीच्या मागील बाजूस जंगली भागात डुक्कर पकडण्यासाठी फासकी लावण्यात आली होती. त्या फासकीत आज मंगळवारी सकाळी बिबट्या अडकला होता. त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी गेलेल्या लोकांवर त्याने फासकीतून सुटून हल्ला केला. त्यामध्ये पाचजण जखमी झाले होते. त्यानंतर त्या बिबट्याचा गेले तीन दिवस शोध सुरु होता. मात्र तो सापडला नव्हता.

बुधवारी सकाळी ७ वाजता ते दुपारी २ वाजेपर्यंत गोरेगाव येथून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बचाव पथकाचे डॉ. शैलेश पेठे व चिपळूण वन विभागाचे कर्मचारी अशा एकूण २५ जणांच्या पथकाने शोधमोहीम करुन संपूर्ण जंगल पिंजून काढले. मात्र त्यांच्या हाती अपयश आले.या शोधमोहीमेनंतरही बिबट्याचा शोध सुरु होता. वनविभागाने वारंवार या भागात जाऊन बिबट्याच्या अस्तित्वाचा काही पुरावा सापडतो का, याची पाहणी केली होती. मात्र वनविभागाला काहीही आढळून आले नाही.रविवारी काही ग्रामस्थ याठिकाणाहून जात असताना त्यांना हा बिबट्या मृतावस्थेत झुडूपात आढळून आला. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे शव आढळून आल्यानंतर याबाबतची खबर तात्काळ वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारीही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे या बिबट्याच्या पायाजवळ कोणतीही जखम नव्हती तर पोटाच्या ठिकाणी थोडेफार वळ दिसत होते.त्यावरून फासकी त्याच्या पोटाला लागली असावी, असा ग्रामस्थांचा कयास आहे. या बिबट्याच्या तोंडात किडे पडले होते. त्यामुळे बिबट्याचा मृत्यू नेमका कधी झाला असावा, याचे गूढ वाढले आहे.वनखात्याने याचा पंचनामा केला आहे. तसेच बिबट्याचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण उलगडणार आहे. 

टॅग्स :leopardबिबट्याRatnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग