शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या इमारतींचे निर्लेखन सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 15:23 IST

जुन्या इमारतींमुळे झाकोळलेला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आता मोकळा होणार आहे. या परिसरातील दहा जुन्या इमारतींचे निर्लेखन करण्यास जिल्हा प्रशासनाकडून सुरूवात झाली असून, सुरूवात पंचायत समितीच्या जुन्या इमारतीच्या निर्लेखनाने झाली आहे. मात्र, या जुन्या कार्यालयांतील कागदपत्रे कुठे हलवावीत, अशी चिंता या कार्यालयांना सतावत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या इमारतींचे निर्लेखन सुरुपरिसर घेणार मोकळा श्वास, कार्यालये कुठे हलवावीत- विभागप्रमुखांना चिंता, पंचायत समितीची इमारत पाडली

रत्नागिरी : जुन्या इमारतींमुळे झाकोळलेला रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आता मोकळा होणार आहे. या परिसरातील दहा जुन्या इमारतींचे निर्लेखन करण्यास जिल्हा प्रशासनाकडून सुरूवात झाली असून, सुरूवात पंचायत समितीच्या जुन्या इमारतीच्या निर्लेखनाने झाली आहे. मात्र, या जुन्या कार्यालयांतील कागदपत्रे कुठे हलवावीत, अशी चिंता या कार्यालयांना सतावत आहे.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत ब्रिटीश काळात बांधलेली आहे. त्याचबरोबर इतर कार्यालयांच्या इमारतीही आता जीर्ण झाल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाचे तसेच उपविभागीय कार्यालयाचे काही वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले होते. त्यामुळे ही इमारत सध्या चांगल्या स्थितीत आहे. मात्र, इतर इमारती मोडकळीस आल्याने धोकादायक झाल्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूला २०१३ साली जिल्हाधिकारी तसेच इतर विभाग व अन्य कार्यालयांसाठी दोन नव्या प्रशासकीय इमारती उभारण्यात आल्या आहेत. सध्या जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच इतर विभाग यांची कार्यालये नव्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आली असून, दुसऱ्या नव्या इमारतीतही काही कार्यालये हलविण्यात आली आहेत. जुन्या इमारतीत अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासह, जिल्हा खनिकर्म, जिल्हा कोषागार कार्यालय आदी कार्यालये नेण्यात आली आहेत.जुने जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नव्या दोन प्रशासकीय इमारतींमधील विविध कार्यालयांत कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमुळे जिल्हाधिकारी यांच्या या दोन्ही इमारतींना वाहन पार्किंगची समस्या सतावत आहे. त्यातच समोर असलेल्या या इमारती जीर्ण झाल्याने त्या निर्लेखित करणे गरजेचे आहे. त्यामुळे या कार्यालयांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.यापैकी या आवारातील पंचायत समितीच्या जुन्या इमारतीचे निर्लेखन करून हे कार्यालय जिल्हा परिषद भवन येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यानंतर आता जिल्हा भूमी अभिलख कार्यालय निर्लेखिकरणाला प्रारंभ झाला आहे. तहसील कार्यालयही नव्या प्रशासकीय इमारतीत हलवण्यात आले आहे.

या कार्यालयाचा केवळ पुरवठा विभाग तसेच निवडणूक विभाग अजून थोडे दिवस या इमारतीत राहणार आहे. या दोन इमारतींसह रेकॉर्ड रूम, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालय, नगर भूमापन कार्यालय, प्रांत कार्यालय, आदींच्या इमारती हटवून हा परिसर मोकळा करण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यालयांना तशा नोटीस जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.निर्लेखनाची कार्यालयेपंचायत समिती, तहसील कार्यालय, हुजूर अभिलेख, दुय्यम उपनिबंधक कार्यालय, अक्षीक्षक, जिल्हा भूमी अभिलेख, उपअधीक्षक, जिल्हा भूमी अभिलेख, नगर भूमापन कार्यालय, अभिलेख कक्ष, वाहनतळ (गॅरेज), जिल्हा निवडणूक कार्यालय, जिल्हा पुरवठा विभाग (जुने कार्यालय). 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorतहसीलदार