शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हाथरस दुर्घटनेविरोधात रत्नागिरी काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 18:21 IST

Hathras Gangrape, Ratnagiri, congres andolan हाथरस (उत्तरप्रदेश) दुर्घटनेचा निषेध करून त्यातील पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देहाथरस दुर्घटनेविरोधात रत्नागिरी काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलनयोगी आदित्यनाथ सरकारच्या मनमानी, असंवैधानिक कृत्याविरोधी घोषणा

रत्नागिरी : हाथरस (उत्तरप्रदेश) दुर्घटनेचा निषेध करून त्यातील पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. योगी आदित्यनाथ सरकारच्या मनमानी, असंवैधानिक कृत्याविरोधी घोषणा देण्यात आल्या.हाथरस येथील दलित समाजातील १९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचे अनन्वित हाल करण्यात आले. या घृणास्पद घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. पीडित कुटुंबाच्या घराजवळ शेकडो पोलिस तैनात करून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

खासदार राहुल गांधी व अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणिस प्रियांका गांधी यांना धक्काबुक्की करत त्यांच्याशी अत्यंत हीन पातळीवरचा व्यवहार करून त्यांना व प्रियांका गांधी यांना अटक केली. काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यावर बेछूट लाठीमार करण्यात आला.

या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाने देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातही आंदोलन छेडण्यात आले आहे.यावेळी कपिल नागवेकर, दत्ता परकर, स्नेहा पिलणकर, अश्विनी भुस्कुटे, अ‍ॅड. अश्विनी आगाशे, रिजवाना शेख, सचिन मालवणकर, संदीप मोहिते, अन्वर काद्री आंदोलनात सहभागी झाले होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारRatnagiriरत्नागिरी