शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : चिपळूण नगरपरिषदेकडून स्वच्छता मोहीम, गटारे व नाल्यांची केली स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 16:45 IST

चिपळूण शहर परिसरातील गटारे व नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यात आली होती. परंतु, यावेळी काढलेला गाळ रस्त्याकडेलाच ठेवण्यात आला होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर अखेर जेसीबीच्या सहाय्याने हा गाळ उचलण्यात आला आहे. तसेच शीवनदीच्या किनाऱ्यावर टाकलेली सडलेली भाजी व कचराही पालिकेने उचलला आहे.

ठळक मुद्देचिपळूण नगरपरिषदेकडून स्वच्छता मोहीमगटारे व नाल्यांची केली स्वच्छता

चिपळूण : शहर परिसरातील गटारे व नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यात आली होती. परंतु, यावेळी काढलेला गाळ रस्त्याकडेलाच ठेवण्यात आला होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर अखेर जेसीबीच्या सहाय्याने हा गाळ उचलण्यात आला आहे. तसेच शीवनदीच्या किनाऱ्यावर टाकलेली सडलेली भाजी व कचराही पालिकेने उचलला आहे. ही स्वच्छता मोहीम गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होती.पावसाळा सुरु होण्यापूर्वीच चिपळूण नगर परिषदेने शहरातील गटारे व नाल्यांची स्वच्छता केली होती. मात्र, त्यामधून काढण्यात आलेला गाळ रस्त्याकडेलाच टाकून ठेवण्यात आला होता. या गाळावर झाडी वाढली होती. साईडपट्टीवरच गाळ असल्यामुळे पादचाऱ्यांना जाता-येता दुर्गंधीचा सामना करावा लागत होता.

मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी तातडीने याठिकाणी स्वच्छता करण्याच्या सूचना पालिका आरोग्य विभागाला दिल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी शहरातील रस्त्याच्याकडेला टाकण्यात आलेला हा गाळ व कचरा उचलण्यासाठी जेसीबी व डंपर आणण्यात आला होता.शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, चिंचनाका ते बहादूरशेख, गोवळकोट रोड या भागात रस्त्याच्याकडेला टाकण्यात आलेला गाळ यावेळी उचलण्यात आला. यावेळी रस्त्याच्या बाजूने वाढलेली झाडी तोडण्याच्या सूचनाही मुख्याधिकाऱ्यांनी दिल्या होत्या.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानRatnagiriरत्नागिरी