शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : चिपळूण पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 14:14 IST

खासगी आरामबस गाडी मालकाविरोधात चोरीची खोटी फिर्याद दाखल केल्याप्रकरणी खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयाने गुहागरचे तत्कालिन पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर, उपनिरीक्षक डी. आर. कदम यांच्यासह सातजणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश चिपळूणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे यांना दिले आहेत.

ठळक मुद्देचिपळूण पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेशआरामबस गाडी मालकाविरोधात चोरीची खोटी फिर्याद

चिपळूण : खासगी आरामबस गाडी मालकाविरोधात चोरीची खोटी फिर्याद दाखल केल्याप्रकरणी खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयाने गुहागरचे तत्कालिन पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर, उपनिरीक्षक डी. आर. कदम यांच्यासह सातजणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश चिपळूणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे यांना दिले आहेत. या प्रकरणी कोणताही विलंब न लावता, तपास करावा, असेही निर्देश दिले आहेत.गुहागरचे तत्कालिन पोलीस निरीक्षक मिसर, उपनिरीक्षक कदम, रश्मी भगवान चव्हाण, अनंत जाधव, रिटा (नगरसेविका, विरार), संदीप श्रीकृष्ण गुरव, वाशिदभाई अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश खेड न्यायालयाने दिले आहेत.

याबाबत दशरथ विश्राम शिंदे (तनाळी, ता. चिपळूण) यांनी गुहागर न्यायालय व खेड सत्र न्यायालयात अ‍ॅड. संदीप पाटील यांच्यावतीने दावे दाखल केले होते. शिंदे यांनी उदरनिर्वाहासाठी खासगी आरामबस खरेदी केली होती. मात्र, यासाठी शिंदे यांनी आपली भाची रश्मी चव्हाण हिच्याकडून पैसे घेतले होते. चव्हाण यांनी शिंदे यांच्याकडे उसने घेतलेल्या पैशासाठी तगादा लावला होता. यामुळे शिंदे यांनी या रकमेपोटी तिच्याकडे ही गाडी तीन महिन्यांसाठी दिली.तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही ती गाडी परत करीत नव्हती. यामुळे शिंदे यांनी दुसऱ्या चावीच्या सहाय्याने गाडी रामपूर येथे आणली. यावेळी रश्मी चव्हाण यांनी चालकाच्या मदतीने शिंदे यांच्या विरोधात गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दशरथ यांच्यासह पाच जणांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी शिंदे यांची परवानगी न घेता, ती गाडी गुहागर पोलीस ठाणे येथे नेऊन उभी केली. यानंतर शिंदे यांनी गुहागर न्यायालयात दावा दाखल केला. मात्र न्यायालयाने पुरावे सादर करण्यास सांगितले. यामुळे शिंदे यांनी खेड जिल्हा न्यायालयात रिव्हीजन अ‍ॅप्लिकेशन केले. त्याची सुनावणी होऊन न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी गुहागर न्यायालयाचा आदेश रद्द केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिस