शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : बहुतांश कर कमी करण्याचा चिपळूण नगरपरिषदेत ठराव, शिवसेनेचे म्हणणे सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 15:25 IST

चिपळूण नगर परिषदेचे बहुतांश कर ५० टक्क्यांहून कमी करण्याबाबतच्या ठरावावर सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे आपले लेखी म्हणणे सादर केले. याविषयी जिल्हाधिकारी कोणता निर्णय देतात, याकडे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देबहुतांश कर कमी करण्याचा चिपळूण नगरपरिषदेत ठरावशिवसेनेचे म्हणणे सादर, जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाकडे लक्ष

चिपळूण : नगर परिषदेचे बहुतांश कर ५० टक्क्यांहून कमी करण्याबाबतच्या ठरावावर सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे आपले लेखी म्हणणे सादर केले. याविषयी जिल्हाधिकारी कोणता निर्णय देतात, याकडे लक्ष लागले आहे.अर्थसंकल्पीय सभेत कर प्रणालीतील बहुतांश कर कमी करण्याचा ठराव सेनेने बहुमताच्या जोरावर केला आहे. एवढेच नव्हे; तर १ एप्रिलपासून या ठरावाची अंमलबजावणी प्रशासनाने सुरु केली आहे.

यावर नगराध्यक्षांनी दाद मागितल्याने याविषयी सुनावणी घेण्यात आली. यावेळी नगर परिषदेतर्फे अ‍ॅड. दिलीप दळी यांनी म्हणणे सादर केले. मात्र, या सुनावणीला सेनेचे सर्वच नगरसेवक गैरहजर होते. त्यानंतर आता सेनेने आपले लेखी म्हणणे सादर केले आहे.

या सुनावणीमध्ये अ‍ॅड. दळी यांनी मालमत्ता कर आकारणी ही शासनाने प्राधिकृत केलेल्या मूल्यांकन अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनानुसार केली जाते, असे नमूद केले आहे. मात्र, मालमत्ता कराविषयी सेनेची कोणतीही हरकत नसल्याचे अहवालात नमूद केले आहे.

तसेच मालमत्ता कर वगळता इतर कोणताही कर आकारणीचा दर वा शुल्क ठरविण्याचा अधिकार कौन्सिलचा आहे. नगर परिषदेच्या नियमानुसारच हा ठराव बहुमताने करण्यात आला आहे.सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात कराचे शुल्क व दरवाढ सुचवण्यात आली नसली तरी यापूर्वीचे लागू असलेले कराचे दर व शुल्क इतकी भरमसाठ आहे की, पुढील काही वर्षात त्यामध्ये वाढ सुचवता येणार नाही. त्यामुळे सभागृहात याविषयी चर्चा करुन दुरुस्ती कर आकारणीस मंजुरी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी